Shocking Video: रुग्णाच्या बेडवरची बिस्किटं कुत्रा खातोय, तर रुग्णालयात चक्क गाय फिरतेय

जिल्हा रुग्णालयाची अवस्था काय असते याचं धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. रुग्णालयात चक्क मोकाट कुत्रे आणि गायी फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय

Updated: Jan 4, 2023, 09:07 PM IST
Shocking Video: रुग्णाच्या बेडवरची बिस्किटं कुत्रा खातोय, तर रुग्णालयात चक्क गाय फिरतेय title=

Shocking Video: सरकारी जिल्हा आरोग्य व्यवस्थेचे (Health System) धिंडवडे निघाल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या असतील. कधी अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे तर कधी अपुऱ्या सोयीसुविधांमुळे रुग्णाला मोठा त्रास सहन करावा लागतो. अशाच एका जिल्हा रुग्णालयाचा धक्कादायक व्हिडिओ (Shocking Video) समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिआवर (Social Media) व्हायरल होत असून या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

जिल्हा रुग्णालयाचे धिंडवडे
उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yagi Adityanath) आणि उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक (Brajesh Pathak) राज्यातील आरोग्य व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करत असतान या प्रयत्नांना धक्का लावणारा प्रकार समोर आला आहे. चांगल्या उपचारांच्या अपेक्षेने जिल्हा रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांची हेळसांड होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशमधल्या बांदा जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. जिल्हा रुग्णालयातील ट्रामा सेंटर वॉर्डात (Trauma Center Ward) चक्क मोकाट कुत्रे (Stray Dogs) आणि गायी (Stray Cows) फिरताना या व्हिडिओत दिसत आहे. 

कुत्रा रुग्णाच्या बेडवरच बिस्किट खातोय
ट्रामा सेंटरमधल्या एका रुग्णाच्या बेडवर एक कुत्रा चक्क रुग्णासाठी आणलेली बिस्किट खाताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे त्याला हकलवण्यासाठी इथे कुणीच नाहीए. दुसरीकडे एक मोकाट गाय रुग्ण आणि त्यांच्याबरोबर आलेल्या नातेवाईकांमध्ये फिरताना दिसत आहे. काही लोकं तिथेच बसलेली असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

याआधीही अशा घटना
रुग्णालयात मोकाट कुत्रे आणि गायी फिरण्याचा हा प्रकार नविन नाही, याआधीही रुग्णालयात अशी दृष्य अनेकवेळा पाहिला मिळत असल्याचं इथले स्थानिक सांगतात. याआधीही तक्रार दाखल करण्यात आली होती, पण संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नाही. या रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. 

सामाजिक कार्यकर्त्यांनी (Social Workers) हा प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मोकाट कुत्र्याने रुग्णावर हल्ला केला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारला आहे. या प्रश्न गांभीर्याने घेण्याची गरज असून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते एएस नोमानी यांनी केली आहे. याप्रकरणी कारवाई झाली नाही तर राज्य सरकारपर्यंत हा मुद्दा नेऊ असं नोमानी यांनी म्हटलंय.