Tech News: इटालियन कंपनीची स्पोट्स बाईक; इंजिन, फिचर्स आणि स्टाईल एकदम जबरदस्त

Auto News: आपल्या सर्वांना बाईक्स फार आवडतात आपल्याला कायमच नव्या बाईक्सचं आकर्षण राहिलं आहे. सध्या अशाच एका बाईकची चर्चा आहे आणि ती म्हणजे इटालियन कंपनीची एमबीपी म्हणजे मोटो बोलगाना पॅशने (Italian Bike Brand Moto Bologna Passione). ही बाईक लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. 

Updated: Jan 4, 2023, 08:01 PM IST
Tech News: इटालियन कंपनीची स्पोट्स बाईक; इंजिन, फिचर्स आणि स्टाईल एकदम जबरदस्त title=
italian bike

Moto Bologna Passione : इटालियन ब्रॅन्डची बाईक भारतीय मार्केटमध्ये लवकरच येणार आहे. त्यामुळे या बाईकची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. सध्या या बाईकची जगभर चर्चा आहे. मोटो बोलगाना पॅशने (Moto Bologna Passione) असं या बाईकचं नावं आहे. या बाईकचं मॉडेल हे ऑटो एक्स्पो 2023 मध्ये लॉन्च होणार असून मोटो बोलगाना पॅशने T1002V असं या मॉडेलचं नावं आहे. त्यामुळे जाणून घेऊया या नव्या बाईकबद्दल जी लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. ही चायनीज मालकीची इटालियन बाईक आहे. (Italian Bike Brand Moto Bologna Passione will Launched in india soom know features and details here)

Keeway आणि Benelli शोरूमद्वारे ही बाईक आपलं मार्केट भारतात विस्तारणार आहेत. मोटो बोलगाना पॅशनेसोबत Keeway कडून SR250 हे मॉडेलही भारतात येणार आहे. त्यामुळे आता या बाईकची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. ही बाईक दिल्लीतील 2023 ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली जाणार आहे. MBP M502N नेकेड ही बाईक भारतीय बाजारापेठेत येणार आहे.  याशिवाय Keeway ची SR250 निओ-रेट्रो ही बाईकही ऑटो एक्स्पो 2023 मध्ये लॉन्च होईल. 

काय आहेत फिचर्स? 

  • MBP M502N चं हे मॉडेल 486cc पॅरलल-ट्विन इंजिनद्वारे चालवले जाते. या इंजिनची खासियत अशी की ही 8,500 rpm वर 51 bhp आणि 6,750 rpm वर 45 Nm टॉर्क तयार करते. बाईकच्या इंजिनची स्पीड ही टॉर्क (Torque) नं मोजता येते. या इंजिनसोबत यात 6-स्पीड गिअरबॉक्स आहेत. यात समोर ड्युअल डिस्क आणि मागे सिंगल डिस्क आहेत.
  • या बाईकमध्ये एलईडी लॅम्प्स, विंडस्क्रिन असे फिचर्स आहेत. त्याचसोबत यात रेड, सिल्वर, सैंड, मॅट असे रंग आहेत. 
  • नॉबी, पिरेली स्कॉर्पियन रैली एसटीआरचं टायर या बाईकमध्ये आहे. 
  • या बाईकचं वजन 235 किलोग्रॅम आहे आणि या बाईकची साईज 2,245mm लांब आणि 965mm रूंद आणि 965mm उंच आहे. 
  • मोटो बोलगाना पॅशनेसोबत लॉन्च होणारी Keeway SR250 SR250 बाईकचे फिचरही फार खास आहे.  हे किवेचे आठवे मॉडेल आहे. 

Adishwar Auto Ride India Pvt Ltd या कंपनीद्वारे ही बाईक लॉन्च केली जाणार आहे. मोटो बोलगाना पॅशने पाच वेगवेगळ्या कंपन्यांद्वारे 26 विविध फिचर्सच्या बाईक विकते आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी मोठा पर्याय निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या या बाईक्स फिचर्स पाहून आपल्यालाही ही बाईक घेण्याचा मोह झाल्याशिवाय राहणार नाही.