shocking News: पेन्सिलचे टोक काढताना सहा वर्षाच्या पोरीचा जीव गेला; मृत्यूमागे उघड झाले धक्कादायक कारण

डोळ्यासमोर  मुलीचा मृत्यू झाल्यामुळे तिच्या वडिलांच्या पालायाखलची जमीन सरकली. या घटनेमुळे मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. पालकांची लहानशी चूक अथवा थोड जरी दुर्लक्ष केलं तरी मुलांच्या जीवावर बेती शकते. यामुळे पालकांनी मुलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. 

Updated: Dec 23, 2022, 06:26 PM IST
shocking News: पेन्सिलचे टोक काढताना सहा वर्षाच्या पोरीचा जीव गेला; मृत्यूमागे उघड झाले धक्कादायक कारण title=

shocking News: मृत्यू  कधी कुणाला कसा गाठेल याचा काही नेम नाही अशीच एक धक्कादायक घटना(shocking News) सहा वर्षाच्या मुलीसह घडली आहे. पेन्सिलचे टोक काढताना(sharpener pencil ) सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात(Uttar Pradesh) ही विचित्र घटना घडली आहे. तपासादरम्यान मुलीच्या मृत्यू मागे धक्कादायक कारण उघडकीस आले आहे. या घटनेमुळे मुलीच्या कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. यामुळे मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देणे गरजेचे असल्याचे देखील अधोरेखीत झाले आहे. 

उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. अर्तिका असे मृत मुलीचे नाव आहे. हमीरपूरच्या कोतवाली भागातील पहाडी वीर गावात ती राहत होती. सहा वर्षाची अर्तिका, तिची आठ वर्षाची मोठी बहिण अंशिका आणि 12 वर्षाचा मोठा भाऊ अभिषेक तिघेजण घरीच टॅरेसवर अभ्यास करत होते. या मुलींचे वडिल नंदकिशोर हे देखील त्यांच्यासह येथे बसले होते.   

अर्तिका पेन्सिलचे टोक काढत होती. अर्तिका शार्पनर तोंडात धरुन पेन्सिलला शर्पनर करत होती. यावेळी तिच्यासह विचित्र प्रकार घडला. पेन्सिलला टोक करत असताना पेन्सिलचा भुसा या अर्तिकाच्या नाकात गेला. नाकावाटे हा पेन्सिलचा भुसा या अर्तिकाच्या श्वास नलिकेत अडकला. यामुळे अर्तिकाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अर्तिका तडफडून जमीनीवर पडली. 

नंदकिशोर यांनी तात्काळ अर्तिकाला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. नंदकिशोर यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या लहान मुलीचा मृत्यू झाला. यामुळे त्यांच्या पालायाखलची जमीन सरकली. या घटनेमुळे मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. पालकांची लहानशी चूक अथवा थोड जरी दुर्लक्ष केलं तरी मुलांच्या जीवावर बेती शकते. यामुळे पालकांनी मुलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.