10 वर्षांच्या मुलाचा 3 वर्षीय मुलीवर दुष्कर्म करण्याचा प्रयत्न; उपाचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू

7 Year Boy Killed 3 Year Old Girl: या मुलीच्या आईसमोरच हा आरोपी मुलगा खेळायला घेऊन जातो असं सांगून पिडीत मुलीला सायकलवरुन घेऊन गेला. तेथे त्याने दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला असताना एका महिलेने त्याला पाहिलं आणि आरडाओरड केला.

| Updated: May 29, 2023, 02:01 PM IST
10 वर्षांच्या मुलाचा 3 वर्षीय मुलीवर दुष्कर्म करण्याचा प्रयत्न; उपाचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू title=
10 Year Boy Killed 3 Year Old Girl (representative photo)

UP 3 Year Girl Rape Case: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका 10 वर्षांच्या मुलाने 3 वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. या सर्व घटनाक्रमामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली. मागील काही दिवसांपासून या चिमुकलीवर उपचार सुरु होते. मात्र उपाचरादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

7 वर्ष वय असल्याचा दावा

आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेऊन बालसुधारणा गृहामध्ये पाठवलं आहे. या मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या घरच्यांनी सुरुवातीला त्याचं वय 7 वर्ष असल्याचा दावा केला होता. मात्र वैद्यकीय चाचणीमध्ये या मुलाचं वय 10 वर्ष असल्याचं सिद्ध झालं. या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे या आरोपीने यापूर्वीही अशाप्रकारे 3 मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिकांनीच यापूर्वीच्या 2 घटनांचा उल्लेख करत हे गंभीर आरोप केले आहेत.

खेळण्यासाठी नाल्यावर नेलं अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या मुलाचा मृत्यू झाला तिला 22 मे रोजी हा आरोपी मुलगा सायकलवर बसून खेळायला गेला होता. एका नाल्याजवळ या मुलीला घेऊन गेल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एका महिलेने त्याला हे कृत्य करताना पाहिलं. त्यानंतर आरोपीने मुलीला जोरात जमीनवर आपटलं आणि तिथून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र 4 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूने तिच्या घरच्यांना मानसिक धक्का बसला आहे. मुलीच्या आईने डॉक्टरांवर गंभीर आरोप करताना, मुलीचा मृत्यू 2 दिवसांपूर्वीच झालेला मात्र हे लपवून ठेवण्यात आल्याचं म्हटलंय.

3 मुलींबरोबर अतीप्रसंगाचा प्रयत्न

आरोपी मुलगा 3 वर्षांच्या मुलीला आपल्यासमोरच खेळायला जातो सांगून गेला होता असा दावा मृत मुलीच्या आईने केला आहे. तो असं दुष्कृत्य करण्यासाठी तिला घेऊन जात असेल असं आपल्याला वाटलं नव्हतं असं या महिलेने म्हटलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या 10 वर्षीय आरोपीने यापूर्वीही त्याच्या एका नातेवाईकाच्या मुलीबरोबरही अशाचप्रकारची जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर काही दिवसांनी अन्य एका दिव्यांग मुलीबरोबरही त्याने अशीच जबरदस्ती केलेली. 3 मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न या मुलाने केला. या सर्व प्रकारासाठी मुलाचे पालकच दोषी असल्याचं पालकांचं म्हणणं आहे. लहानपणापासून या मुलाला अशाचपद्धतीने तिच्या पालकांनी संगोपन केलं आहे असा येथील लोकांचा दावा आहे. या आरोपी मुलाची वैद्यकीय चाचणी करुन त्याला बालसुधारणागृहात पाठवण्यात आलं आहे.