Blood Sugar Range: वयोमानानुसार ब्लड शुगर लेव्हल किती असली पाहिजे? तज्ज्ञांनी सांगितलंय गणित

Blood Sugar Level Chart: सध्याच्या घडीला मधुमेह हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होण्याची शक्यता असते. मुळात ही समस्या लठ्ठपणा, शारीरिक हालचालींशिवाय जीवनशैली आणि कौटुंबिक इतिहासामुळे होऊ शकते. 

सुरभि जगदीश | Updated: Apr 26, 2024, 11:56 AM IST
Blood Sugar Range: वयोमानानुसार ब्लड शुगर लेव्हल किती असली पाहिजे? तज्ज्ञांनी सांगितलंय गणित title=

Blood Sugar Level Chart: आजकाल चुकीच्या जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे अनेक आजार मागे लागतात. यातील एक आजार म्हणजे डायबेटीज. सध्याच्या काळात डायबेटीजचे अनेक रूग्ण केवळ देशात नाही तर जगभरात वाढताना दिसतायत. ही समस्या असलेल्या व्यक्तींच्या शरीरात ब्लड शुगर लेवल वाढत जाते. परिणामी ही ब्लड शुगर लेवल कंट्रोल करणं गरजेचं आहे. 

सध्याच्या घडीला मधुमेह हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होण्याची शक्यता असते. मुळात ही समस्या लठ्ठपणा, शारीरिक हालचालींशिवाय जीवनशैली आणि कौटुंबिक इतिहासामुळे होऊ शकते. जर तुम्हालाही या समस्येपासून दूर राहायचं असेल तर शरीरातील रक्तातील पातळीवर लक्ष देणं गरजेचं आहे.

मधुमेहाची अनेक कारणे आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा आजार लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना होऊ शकतो. टाइप 1 मधुमेहाच्या स्थितीत, रुग्णाच्या शरीरात इन्सुलिन तयार होणं थांबतं किंवा फारच कमी प्रमाणात तयार होते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढतं. टाईप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये इन्सुलिन तयार होतं मात्र इन्सुलिन रजिस्टेंटमुळे शरीर त्याचा योग्य वापर करू शकत नाही. इन्सुलिन हा हार्मोन आहे जो रक्तातील साखर नियंत्रित करतो.

ब्लड शुगर लेव्हल किती प्रमाणात असणं नॉर्मल?

सर्व वयोगटातील लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी जवळपास सारखीच असते. सामान्यतः जेवणापूर्वी आणि नंतर रक्तातील साखर तपासली जाते. रिकाम्या पोटी जी रक्तातील साखर तपासली जाते त्याला फास्टिंग शुगर म्हणतात. खाल्ल्यानंतर 2 तासांनी तपासलेल्या साखरेच्या पातळीला पोस्ट मील शुगर म्हणतात. 

शरीरातील फास्टिंग शुगरची पातळी 100 mg/dL पेक्षा कमी असते आणि पोस्ट मील शुगरची पातळी 120 ते 140 mg/dL असते. 

ज्यावेळी फास्टिंग शुगर 100-125 mg/dL असते आणि पोस्ट मील शुगर 140-160 mg/dL असते, तेव्हा प्री डायबिटीजमध्ये गणली जाते. प्री-डायबेटीजच्या रुग्णांनी साखरेची पातळी नियंत्रित ठेवल्यास मधुमेह टाळता येऊ शकतो.