'भाजपवर टीका करायची असेल तर शत्रुघ्न सिन्हांनी पक्षात राहू नये'

नरेंद्र मोदी यांनीही कधीही चहा विकला नाही.

Updated: Jan 17, 2019, 03:15 PM IST
 'भाजपवर टीका करायची असेल तर शत्रुघ्न सिन्हांनी पक्षात राहू नये' title=

पाटणा: केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांची कायम चिरफाड करणारे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात भाजपमधील नेते आक्रमक झाले आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांना भाजपमध्ये इतकाच त्रास होत असेल तर त्यांनी पक्षातून बाहेर पडावे, असे वक्तव्य बिहारेच उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी केले. शत्रुघ्न सिन्हा ज्याप्रकारे बोलतात, जी भाषा वापरतात, ते पाहता त्यांनी पक्षातून बाहेर पडायला हवे. इतका त्रास होत असेल तर ते पक्षात का थांबले आहेत? ते दरवेळी पक्षाला दुषणे देतात आणि नंतर आपण अजूनही भाजपमध्ये असल्याचे सांगतात. यशवंत सिन्हा यांच्या संगतीचा त्यांच्यावर वाईट परिणाम झाला आहे, असे सुशील मोदी यांनी म्हटले. ते एका स्थानिक वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. 
 
 सुशील मोदी यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे भाजपमधील नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. शत्रुघ्न सिन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करायलयाही ते कचरत नाहीत. नरेंद्र मोदी यांनीही कधीही चहा विकला नाही. तो केवळ प्रोपोगंडाचा एक भाग होता. परंतु, एक चहावाला पंतप्रधान होऊ शकतो तर मला साधे मंत्रीपद मिळू शकत नाही का, असा सवाल त्यांनी नुकताच एका कार्यक्रमात विचारला होता.

डेली सोपमधील अभिनेत्रीला मंत्रीपद देता, मी काय वाईट होतो?- शत्रुघ्न सिन्हा
 
याशिवाय, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची वेळ मागितल्याचेही त्यांनी सांगितले होते. जेणेकरून भाजपच्या चुकीच्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून देता येतील. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी मला भेटीसाठी वेळ दिली नाही. त्याऐवजी मला पक्षाध्यक्ष अमित शहा यांना भेटायला सांगण्यात आले. मात्र, मला थेट पंतप्रधानांशीच बोलायला आवडेल, असेही सिन्हा यांनी सांगितले होते.