नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नवीन तिसरी आघाडी तयार करण्याचे संकेत दिले आहेत. पर्यायी पुरोगामी व्यासपीठ उभे केले जावे, म्हणून विचार करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं की, 'सीताराम येच्युरी यांनी जे म्हटले आहे. त्यावर विचार करण्याची गरज आहे. जेव्हा जेव्हा असे प्रस्ताव येतात तेव्हा आम्ही त्याकडे लक्ष देतो.'
ते म्हणाले की पश्चिम बंगालसारख्या काही राज्यांच्या सद्यस्थितीत केंद्रीय नेतृत्वाद्वारे होणारे हल्ले लक्षात घेता कोणत्याही डेमोक्रॅटिक पक्षाने ममता बॅनर्जी यांचे समर्थन केले पाहिजे. मंगळवारी कॉंग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर पीसी चाको यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. शरद पवार म्हणाले की, आज सीताराम येच्युरी यांनीही आम्हाला सांगितले की,आम्हीही चाको सरांचे स्वागत करतो.
Kerala CM called me and told me that the Left is happy with PC Chacko joining the NCP: NCP Chief Sharad Pawar pic.twitter.com/7pGCr80vrT
— ANI (@ANI) March 16, 2021
शरद पवार म्हणाले की, येच्युरी यांनी फोनवर सांगितले की, पर्यायी व्यासपीठ तयार करण्याची आवश्यकता आहे. त्याबद्दल विचार करा. आम्ही मिनिमम अॅडमिन प्रोग्राम बनवितो, त्यामुळे त्यामध्ये कोणताही विरोधाभास नाही. ते म्हणाले की, अनेक नेते पर्यायी आघाडी तयार करण्याविषयी बोलले आहेत आणि त्याबाबत गंभीरपणे विचार करत आहोत. केरळबद्दल ते म्हणाले की, '40 वर्षांपासून तेथे एलडीएफ आहे.'
शरद पवार म्हणाले की, पीसी चाको राष्ट्रवादीत दाखल झाल्याने पक्षाचे केरळ युनिट खूप खूश आहे. प्रफुल्ल पटेल यांनीही चाको यांच्या पार्टीत सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे, केरळमध्ये विधानसभा निवडणुका काही दिवसांवर असताना शरद पवार यांचे हे विधान आले आहे. केरळमध्ये डाव्या पक्षांची आघाडी एलडीएफमध्ये राष्ट्रवादी ही आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष सत्ताधारी महा विकासआघाडीत एकत्र आहेत.