नवी दि्लली : लग्नाचे वचन (marriage promise) देऊन शारीरिक संबंध (sex) ठेवणे बलात्कारच (rape) ठरत नाही, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने ((delhi highcourt) दिला आहे. दीर्घ काळापासून शारीरिक संबंध ऐच्छिक किंवा हव्यासापोटी असतात असेही मत नोंदवले आहे. दरम्यान, पीडित महिलेची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले की, लग्नाचे वचन देऊन ठेवलेले शारीरिक संबंध नेहमीच बलात्कार असू शकत नाही. मात्र, वचन देऊन पीडीतेचे शोषण केल्यास हा बलात्काराचा गुन्हा ठरू शकतो, असे म्हटले आहे. न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवला आहे. थोड्या काळासाठी शारिरीक संबंध बनवले जात असतील तर ते बलात्काराच्या गुन्ह्यात सामील होतात. मात्र हे संबंध जेव्हा दीर्घकाळ अथवा अनिश्चित काळासाठी असतात तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे.
न्यायमूर्ती बाखरू यांनी बलात्काराचे आरोप केलेल्या व्यक्तीला आरोपमुक्त करण्याच्या खालच्या न्यायालयाच्या निर्णयाला योग्य असल्याचे म्हटले आहे. महिलाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. दरम्यान, अशा प्रकरणांमध्ये लग्नाचे वचन देऊन पीडितेचे शोषण करणे हे बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये येते. मात्र दीर्घकाळापर्यंत संबंध ठेवल्यास तर तो बलात्कार ठरू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
महिलेचा आरोप होता की त्या व्यक्तीने लग्नाच्या नावावर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. त्यानंतर त्या व्यक्तीने धोका दिला. तसेच महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले होते, त्याने दुसऱ्या महिलेसाठी मला सोडले.