Private Bus And Truck Accident on Lucknow-Gorakhpur highway in Ayodhya : उत्तर प्रदेशमधील अयोध्यामधील लखनऊ - गोरखपूर महामार्गावर खासगी बस - ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात सात ठार, तर 12 जण जखमी झाले आहेत. 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला ट्रकने जोराची धडक दिली ही धडक इतकी भयंकर होती की ट्रक पलटी होऊन बसच्या वर चढला. या अपघातात बसचा चक्काचूर झाला. लखनऊ - गोरखपूर महामार्गावर शुक्रवारी रात्री उशीरा ही घटना घडली. या अपघातानंतर लखनऊ-गोरखपूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली होती.
दरम्यान, या अपघातानंतर जखमींना तत्काळ जवळच्या सरकारी रुग्णालायात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री अयोध्येकडून येणारी खासगी बस आंबेडकरनगरकडे जाण्यासाठी लखनऊ - गोरखपूर महामार्गवरुन वळण घेत होती. मात्र, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस थेट दुसऱ्या बाजुने येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, बसमधील काही प्रवाशी बाहेर फेकले गेलेत. तर काही ट्रकखाली दबले. ट्रक बसवर पलटी झाल्याने बसचा चक्काचूर झाला.
Uttar Pradesh | At least 12 people injured in a collision between a passenger bus and a truck on the Lucknow-Gorakhpur highway in Ayodhya pic.twitter.com/l7MvdSHCQZ
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 21, 2023
या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावरील अपघात ग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजुला करण्यात आली. तर ट्रकखाली अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातातील लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करत दु:ख व्यक्त केले. अयोध्येतील अपघाताचे वृत्त ऐकून मन दु:खी झाले आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसेच जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करतो, असे ते म्हणाले.