Bank Holiday list: सप्टेंबर महिन्यात बॅंकाना तब्बल 'इतके' दिवस सुट्ट्या

Bank Holiday list: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार सप्टेंबर महिन्यात एकूण अकरा दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार यासारख्या नियमित सुट्ट्या वगळल्या जातात. अनेक बँकांच्या सुट्ट्या प्रादेशिक असतात.

Pravin Dabholkar | Updated: Aug 24, 2023, 11:41 AM IST
Bank Holiday list: सप्टेंबर महिन्यात बॅंकाना तब्बल 'इतके' दिवस सुट्ट्या title=

Bank Holiday 2023: सप्टेंबर महिना सुरु व्हायला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. पुढच्या महिना महत्वाचे सण घेऊन येत आहे. अशावेळी सरकारी कार्यालयांसोबत बॅंकांनाही सुट्टी असेल. दैनंदिन बॅंकासंदर्भातील कामे करण्यासाठी तुम्हाला आधीच नियोजन करावे लागते. यासाठी नेमक्या किती सुट्ट्या आहेत? याबद्दल जाणून घेऊया. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार सप्टेंबर महिन्यात एकूण अकरा दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार यासारख्या नियमित सुट्ट्या वगळल्या जातात. अनेक बँकांच्या सुट्ट्या प्रादेशिक असतात.

सप्टेंबर महिन्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी, महाराजा हरिसिंह जी यांचा जन्मदिन, ईद-ए-मिलाद-उल-नबी या दिवशी काही राज्यांतील बँका बंद राहणार आहेत. 

तारीख आणि सुट्ट्या 

6 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीची सुट्टी 

7 सप्टेंबर रोजी जन्माष्टमी

18 सप्टेंबर रोजी विनायक चतुर्थी

19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी/संवत्सरी (चतुर्थी पक्ष)

20 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी (दुसरा दिवस)/नुखाई

आईनेच केला घात! मुलगी साखरझोपेत असताना अंगावर पेट्रोल ओतून पेटवले, धक्कादायक कारण समोर

22 सप्टेंबर रोजी श्री नारायण गुरु समाधी दिन

23 सप्टेंबर रोजी महाराजा हरिसिंह जी यांचा जन्मदिन

25 सप्टेंबरला श्रीमंत शंकरदेवाचा जन्मोत्सव

27 सप्टेंबर रोजी बँकेला सुट्टी: मिलाद-ए-शरीफ (प्रेषित मोहम्मद यांचा जन्मदिवस)

28 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद

29 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद-उल-नबी नंतर इंद्रजात्रा/शुक्रवार.

गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांची घराच्या सोडतीसंदर्भात मोठी घोषणा

शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या पकडल्यास सप्टेंबर 2023 मध्ये एकूण 18 दिवस बँका बंद राहतील.

3 सप्टेंबर : रविवार

9 सप्टेंबर : दुसरा शनिवार

10 सप्टेंबर : दुसरा रविवार

17 सप्टेंबर : रविवार

23 सप्टेंबर : चौथा शनिवार

24 सप्टेंबर : रविवार