SEBI | तुम्हीही IPO मध्ये गुंतवणूक करीत असाल तर, जाणून घ्या नवीन नियम

IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांना सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) मोठी खुशखबर दिली आहे. यासंदर्भात त्यांनी नवा निर्णय घेतला आहे.

Updated: Apr 6, 2022, 07:44 AM IST
SEBI | तुम्हीही IPO मध्ये गुंतवणूक करीत असाल तर, जाणून घ्या नवीन नियम title=

मुंबई : SEBI: IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. सुधारीत नियम गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरू शकतात.

नियम 1 मेपासून लागू

एका इंग्रजी वृत्तपत्राने सेबीच्या परिपत्रकाचा आधारे ही बातमी दिली आहे. या परिपत्रकानुसार, 'आयपीओसाठी बोली लावणाऱ्या सर्व किरकोळ गुंतवणूकदारांनी 5 लाख रुपयांपर्यंतच्या बोलीसाठी UPI पेमेंटचा वापर करता येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते त्यांचा UPI आयडी त्यांच्या अर्जात (बिड-कम-एप्लीकेशन) फॉर्म देखील देऊ शकतात. हा नियम 1 मे पासून लागू होणार असल्याची माहिती समोर येतेय.

एनपीसीआयकडून यंत्रणा तयार

एनपीसीआयने या नवीन प्रणालीसाठी आपल्या यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेतला असल्याचे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच सुमारे 80 टक्के मध्यवर्ती संस्थांनीही नवीन नियमांनुसार बदल करण्याला दुजोरा दिला आहे.

4 महिन्यांपूर्वी नियमांमध्ये बदल

NPCI ने UPI पेमेंट व्यवहाराचे नियमांमध्ये बदल केल्यानंतर SEBI चा हा निर्णय सुमारे 4 महिन्यांनी आला आहे. त्या निर्णयात NPCI ने UPI वरून प्रति व्यवहार मर्यादा 2 लाख रुपये केली होती. त्याच वेळी, SEBI ने 2018 मध्येच IPO मधील गुंतवणुकीसाठी UPI द्वारे पेमेंट करण्याची परवानगी दिली होती, जी 1 जुलै 2019 पासून लागू झाली आहे.