Crime News : लग्नाच्या 6 महिन्यानंतर सहज Google वर बायकोचं नाव सर्च केले आणि पतीला धक्काच बसला

ऑनलाईन मॅट्रिमोनिअल App च्या माध्यमातून तरुणाचे लग्न झाले. पण सहा महिन्यानंतर त्याला पत्नीचे खरं रुप समजले (Crime News). 

Updated: Feb 15, 2023, 06:17 PM IST
Crime News : लग्नाच्या 6 महिन्यानंतर सहज Google वर बायकोचं नाव सर्च केले आणि पतीला धक्काच बसला  title=

Marriage Fraud Crime News : आपल्याला चांगला, समजुतदार आणि प्रामाणिक जोडीदार मिळावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यामुळेच लग्न जुळवताना वधु वराची चौकशी केली जाते. तरी देखील अनेकांची फसवणुक होतेच. असाच काहीसा प्रकार एका तरुणासह घडला आहे. लग्नाच्या 6 महिन्यानंतर सहज Google वर बायकोचं नाव सर्च केले. यानंतर Google पेजवर जे काही दिसल ते पाहून पतीला जबरदस्त धक्का बसला (Marriage Fraud). पोरबंदर येथील तरुणासह हा प्रकार घडला आहे (Crime News ). 

विमल कारिया असं या तरुणाचे नाव आहे.  पोरबंदर येथील रहिवासी असलेल्या विमलचे आसाममधील गुवाहाटी येथील रिता दास नावाच्या तरुणीशी विवाह झाला. ऑनलाईन मॅट्रिमोनिअल App च्या माध्यमातून त्याचे आणि रिताचे लग्न जुळले होते. रिताने आपल्या प्रोफाईलवर घटस्फोटीत असं मेन्शन केल होते. यानंतर विमलने  रिताची चौकशी करुन तिच्यासह विवाह केला.

लग्न झाल्यानंतर रिता विमलसह पोरंबद येथे रहायला आली. लग्लाला सहा महिने झाल्यानंतर जमीनीचे काम आहे असे सांगून ती गुवाहटी येथे माहेरी निघून गेली. यानंतरच तिचे खरे रुप विमल समोर उघड झाले. 
रिता गुवाहाटीला गेल्यानंतर  तिने विमलशी काहीच संपर्क साधला नाही. विमल तीला सतत फोन करत होता. पण प्रत्येक वेळी फोन बंद येत होता.

एके दिवशी अचानक रिताने विमलच्या कुटुंबीयांच्या वकिलाला फोन करून एक लाखाची मागणी केली. मला जमीन प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे जामीन मिळवण्यासाठी एक लाख रुपये लागतील तिने वकिलांना सांगितले. 
यामुळे विमलने रिताला पोलिसांच्या तावडीतून सोजवण्यासाठी एक लाख रुपये तिच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले. त्यानंतर रीताचा पुन्हा कोणताही फोन न आल्याने विमलला संशय आला.

Google वर कळाला पत्नीचा कारनामा

वकिलाच्या मदतीने विमलने गुवाहाटी ते पोरबंदरपर्यंत जामीनाच्या कागदपत्रांची प्रत ऑनलाइन मागवली. पेपर्समध्ये रीता दास ऐवजी रीता चौधरी असे लिहिले होते. एवढेच नाही तर तिच्या पतीचे नाव अनिल असे त्यावर नोंदवले होते. हे सर्व पाहून विमलला धक्काच बसला.  विमलने गुगल सर्चवर रिता चौधरी गुवाहाटी असे सर्च केले. रिताचे फोटो दिसले. रिता आधीच विवाहित आहे आणि तिचा पती अनिल खून, दरोडा अशा अनेक गंभीर आरोपांत तुरुंगात शिक्षा भोगत आहे. रितावरही पाच हजारांहून अधिक वाहने चोरल्याचा आरोप आहे. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच विमलमे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.