चिल्लर स्वरूपात फी घेण्यास शाळेने नकार दिल्याने मुलीचे वर्ष वाया....

शाळेच्या व बॅंकेच्या मनमानीमुळे एका मुलीचे वर्ष वाया गेले. त्याचे झाले असे...

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 21, 2018, 08:15 PM IST
चिल्लर स्वरूपात फी घेण्यास शाळेने नकार दिल्याने मुलीचे वर्ष वाया.... title=

भोपाळ : शाळेच्या व बॅंकेच्या मनमानीमुळे एका मुलीचे वर्ष वाया गेले. त्याचे झाले असे... शाळेची फि चिल्लर स्वरूपात घेण्यास शाळेने नकार दिला आणि त्याचबरोबर त्या विद्यार्थींनीला परिक्षेलाही बसू दिले नाही. हा प्रकार उघड झाल्यावर तिचे भविष्य खराब होणार नाही, असा बचावात्मक दावा शाळा करत आहे.

नेमके काय आहे हे प्रकरण?

गंजबासौदा येथे राहणाऱ्या ठाकूर सिंग रघुवंशी यांची मुलगी तेजस्वी रघुवंशी ही विद्यार्थीनी सेंट जोसफ शाळेत २ इयत्तेत शिकणार आहे. फी भरल्याशिवाय मुलीला परिक्षेला बसू दिले जाणार नाही असे स्पष्टपणे शाळेच्या प्रबंधकांनी विद्यार्थींनीच्या वडीलांना सांगितले. तेजस्वीनीच्या मजूर वडीलांनी पिकी बॅंकेत साठवलेली चिल्लर जमा केली आणि मुलीचे १९७० रुपये फीज भरण्यासाठी शाळेत पोहचले. मात्र शाळेने चिल्लर घेण्यास नकार दिला आणि फी शाळेच्या खात्यात जमा करण्यास सांगितले.

मात्र त्यांना पाझर फुटला नाही

यानंतर तेजस्वीनीचे वडील बॅंकेत पोहचले. तर तिकडेही बॅंकेच्या अधिकाऱ्याने चिल्लर मोजले पण जमा करण्यास नकार दिला. खूप प्रयत्न करूनही बॅंकेत पैसे जमा करण्यास विद्यार्थींनीच्या वडीलांना यश आले नाही. त्यामुळे शाळेची फी भरली गेली नाही आणि त्या विद्यार्थींनीला परीक्षेला बसता आले नाही.