मुलांनी जीवनात 100% यशस्वी व्हावं असं वाटतंय, मग सद्गुरूंनी सांगितलेला 3R Formula फॉलो करा

Parenting Tips : मुलांनी जीवनात यश संपादन करावं असं प्रत्येक पालकांना वाटत असतं. पण अशावेळी नेमकं काय करावं हे त्यांना कळत नाही. सद्गुरूंनी सांगितलेला हॉ फॉर्म्युला ठरेल फायदेशीर 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 28, 2023, 01:13 PM IST
मुलांनी जीवनात 100% यशस्वी व्हावं असं वाटतंय, मग सद्गुरूंनी सांगितलेला 3R Formula फॉलो करा  title=

Satguru Wamanrao Pai Tips : मुलांचं संगोपन करत असताना प्रत्येक पालक वेगवेगळ्या प्रश्नांना तोंड देत असतो. अशावेळी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो. मुलांचा अभ्यास? कारण मुलांचा पाया मजबूत असेल तर जीवनात यशस्वी होण्यापासून त्यांना कुणीच रोखू शकत नाही. असं असताना मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावावी. किंवा त्यांच्याकडून मनापासून अभ्यास कसा करून घ्यावा, असा प्रश्न अनेक पालकांना असतो. असं असताना सद्गुरू श्री वामनराव पै यांनी सांगितलेले 3R Formula खूप मदत करेल. या फॉर्म्युलाचा वापर अगदी पहिली ते उच्च शिक्षण करणाऱ्या मुलांपर्यंत सगळ्यांना फायदेशीर ठरू शकतो. 

सदगुरूंनी सांगितलेला 3R Formula 

सद्गुरू श्री वामनराव पै यांनी शिक्षणाची व्याख्या सांगितली आहे. क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण. त्यामुळे ज्ञान ग्रहण करताना या 3R Formula चा वापर करावा. या फॉर्म्युलामध्ये सद्गुरूंनी तीन R सांगितले आहेत. Read, Remember आणि Reproduce हे तीन आर सांगण्यात आले आहेत. या त्रिसुत्रीच्या मदतीने मुलांना अभ्यास करताना येणारा कंटाळा देखील नाहीसा होतो एवढंच नव्हे तर या त्रिसुत्रीच्या मदतीने कोणत्याही वयात यश संपादन करणे शक्य होतं. 

पहिला R - Read म्हणजे वाचणे

वाचणे.. जो तुमचा अभ्यास आहे त्याचे वाचन करणे. पण हे वाचन कसे करावे. वाचत असताना काही गोष्टी लक्षात ठेवावे. 

  • जसे की, पुन्हा पुन्हा वाचणे. 
  • मोठ्याने वाचणे
  • वाचताना अक्षरांवर नजर ठेऊन वाचणे 

या पद्धतीने अभ्यास केला तर लक्षात राहणे सहजच शक्य होते एवढंच नव्हे तर त्याचा खूप चांगला फायदा भविषयात होताना दिसतो. 

दुसरा R - Remember म्हणजे लक्षात ठेवणे

दुसरा R आहे वाचलेले लक्षात ठेवणे. अनेकदा विद्यार्थी फक्त वाचतात आणि आपला अभ्यास झाला असं समजतात. पण वाचलेल्या गोष्टीचे चिंतन करणे अत्यंत गरजेचे असते. 

  • वाचलेले लक्षात ठेवणे 
  • लक्षात ठेवलेल्या अभ्यासाचे चिंतन करणे 
  • मनात वाचलेल्या अभ्यासाचा विचार घोळवणे 
  • या तीन पद्धतीने दुसरा R फॉलो केल्यास नक्कीच फायदा होईल. 

तिसरा R- Reproduce म्हणजे लिहून काढणे 

वरील दोन पायऱ्यांमध्ये अभ्यास वाचणे आणि वाचलेला अभ्यास लक्षात ठेवणे या गोष्टी फॉलो केल्या. पण तिसऱ्या पायरीमध्ये लक्षात ठेवलेला अभ्यास लिहून काढणे. वाचलेलं लक्षात राहिलं आणि ते लिहून काढणे यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. कारण आपला किती अभ्यास झालाय हा विश्वास मुलांना मिळतो. त्यामुळे अभ्यासाची इतर तयारी करणे मुलांना शक्य होते.