धक्कादायक | 'सरल वास्तू' फेम चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या

Saral Vaastu Fame of Chandrashekhar Guruji :  कर्नाटकच्या हुबळीमध्ये वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर यांची निर्घृण हत्या.   

Updated: Jul 5, 2022, 06:44 PM IST
धक्कादायक |  'सरल वास्तू' फेम चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या title=

बंगळुरु : कर्नाटकच्या हुबळीमध्ये वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर (Saral Vaastu Fame of Chandrashekhar Guruji) यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे हल्लेखोर शिष्याच्या वेषात आले होते. शिष्याच्या वेषात आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूचे तब्बल 70 वार केले. या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (saral vaastu fame of chandrashekhar guruji died at karnataka)

हुबळीच्या प्रेसिडेंट हॉटेलमध्ये ही घटना घडलीये. हल्लेखोर आधी चंद्रशेखर यांच्या पाया पडले. त्यानंतर दोघांनी मिळून चंद्रशेखर यांच्यावर सपासप वार केले. दोन्ही हल्लेखोरांना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्गा इथून अटक करण्यात आली. त्यांना हुबळी इथं आणण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. 

कौटुंबिक सूत्रांनुसार,चंद्रशेखर गुरुजी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात कंत्राटदार म्हणून केली. त्यानंतर त्यांना मुंबईत नोकरी मिळाली, जिथे ते स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी वास्तुशास्त्राचा व्यवसाय केल्याचं सांगितले. हुबळी येथे 3  दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबातील एका मुलाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे चंद्रशेखर गुरुजी हे शोकसभेत सहभागी होण्यासाठी आले होते".  

"काही लोकांनी गुरुजींना हॉटेलच्या लॉबी एरियात बोलावले. तिथेच ते थांबले होते. यादरम्यान एकाने त्याला नमस्कार केला. त्यानंतर त्यांच्यावर चाकूने वार केला. चाकूने केलेल्या वारांमुळे गुरुजी गंभीर जखमी झाले. त्यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता", अशी माहिती हुबळीचे पोलीस आयुक्त लाभू राम यांनी दिली.