संजय राऊत यांची पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका

संजय राऊत यांची एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया

Updated: Feb 8, 2021, 03:40 PM IST
संजय राऊत यांची पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका title=

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टिका केली आहे. अमित शाहांनी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात सभा घ्यावी. शाहांनी राज्यात पक्ष वाढवावा, प्रयत्न करावा. सरकारचा एकही खिळा हलणार नाही. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

'आम्ही राणेंचा दोन वेळा पराभव केला आहे. लोकसभेला पराभव केला आहे. शिवसेनेचा मार्ग अमित शाहांना माहीत नाही. हा डांबरी रस्ता नाही, अग्निपथ आहे. चटके बसलेत आम्हाला. आम्हाला संघर्ष करून मिळालंय. शाहांनी एका मुलाखतीत म्हटलंय की बंद दाराआड चर्चा बाहेर बोलणं पंरपरा नाही. मग शाहांनी परंपरा कशी मोडली ?. तुमची वेदना समजू शकतो. सीबीआय, ईडी, अफवांचे अड्डे असतानाही आम्ही सरकार बनवलं. शिवसेनेच्या शब्दकोशात लाचारी शब्द नाही. रणशिंग हा शब्द शिवसेनेला शोभतो.' असं राऊत म्हणाले.

'आंदोलनातूनच भाजपचा जन्म झाला आहे. इंदिरा गांधी म्हणत होत्या परदेशी हात आहे. मग भाजप परजीवी ठरलं का ?. शेतकरी आंदोलनाची थट्टा करणं हा देशाचा अपमान आहे. स्वातंत्र्य चळवळीचा अपमान आहे. गावागावात पंचायती होताहेत ते परजीवी आहेत का ? भाजपने युपीए विरोधात आंदोलन केली. तेव्हा भाजप परजीवी होती का ?' असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

'शिवसेनेचा जन्म पण आंदोलनातून झालाय. अशी चेष्टा करणं लोकशाहीला मारक झालंय. इतिहासाची मडी उकरून काढणं सोपं असतं. संघाचं कश्मीर मधील आंदोलन परजीवी आहे का ? पीएमच्या भाषणात थिल्लरपणा आलाय. लोकशाहीत आंदोलनाचे स्वागत करायला पाहीजे. शीख समाजाला खलिस्तानी कोण म्हणतंय? भाजपच दहशतवादी ठरवतंय. मोदी हवेत गोळीबार करत आहेत.' असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.