संजय मल्होत्रा ​रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर, कोण आहेत? जाणून घ्या

RBI Governor sanjay Malhotra: 11 डिसेंबर रोजी संजय मल्होत्रा ​​RBI चे नवे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

Pravin Dabholkar | Updated: Dec 9, 2024, 06:04 PM IST
संजय मल्होत्रा ​रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर, कोण आहेत? जाणून घ्या title=
संजय मल्होत्रा

RBI Governor sanjay Malhotra: वित्त मंत्रालयातील सचिव (महसूल) संजय मल्होत्रा ​​हे रिझर्व्ह बँकेचे पुढील गव्हर्नर असणार आहेत. सरकारने सोमवारी आरबीआयच्या नवीन गव्हर्नरसाठी संजय मल्होत्रा ​​यांच्या नावाची घोषणा केली. ते विद्यमान आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांची जागा घेणार आहेत. डिसेंबर 2018 मध्ये दास यांची पहिल्यांदा आरबीआय गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ 10 डिसेंबरला संपत आहे. कोण आहेत संजय मल्होत्रा? जाणून घेऊया. 

11 डिसेंबर रोजी संजय मल्होत्रा ​​RBI चे नवे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. त्यांचा कार्यकाळ पुढील 3 वर्षांचा असेल. संजय मल्होत्रा ​​भारतीय रिझर्व्ह बँकेचे 26 वे गव्हर्नर असतील.संजय मल्होत्रा ​​हे 1990 च्या बॅचचे राजस्थान केडरचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी कानपूरमधून इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. 

संजय मल्होत्रा यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. मल्होत्रा ​​यांच्याकडे ऊर्जा, वित्त, कर, आयटी आणि माइन्स अशा खात्यांमधील कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये ते REC चे अध्यक्ष आणि मॅनेजिंग एडीटर झाले. मल्होत्रा ​​हे ऊर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिवही राहिले आहेत.