सांगली : सांगली जिल्ह्यातील रेठरे धरण येथे कोरोनाचा एक रुग्ण सापडला आहे. २० मार्चला तो मुंबईहून गावी आला होता. दोन दिवसापूर्वी त्याला मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईत त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या २५ व्यक्तींना मिरजेतील कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर तात्काळ रेठरेधरण हे गाव सील करण्यात आलं आहे.
मुंबईत राहणारी ही व्यक्ती २० मार्चला रेठरे धरण येथे आली होती. ५ एप्रिलला तो आजारी पडल्याने इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवस तो तेथे उपचार घेत होता.
त्यांनतर तो १० एप्रिलला मुंबईला गेला. मुंबई मधील अपोलो हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं. रविवारी त्याची कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली.
त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या २५ व्यक्तींना मिरजेतील कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून कोरोणा चाचणीसाठी यांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत.
सद्यस्थितीत या व्यक्तींमधील कोणाच्यातही लक्षणे आढळत नाहीत. तथापि चाचणीनंतर ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येतील त्यांना आयसोलेशन कक्षात दाखल करून उपचार करण्यात येतील. ज्यांचे अहवाल निगेटिव्ह येतील त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन'मध्ये ठेवण्यात येईल.