कफ सिरपनंतर Paracetamolही निकृष्ट दर्जाच्या; औषध चाचणीत अनेक कंपन्या नापास

ताप, अंगदुखी सारख्या आजारांवर गोळ्या घेण्यापूर्वी निकृष्ट ठरलेल्या औषधांची वाचा यादी 

Updated: Oct 13, 2022, 01:18 PM IST
कफ सिरपनंतर Paracetamolही निकृष्ट दर्जाच्या; औषध चाचणीत अनेक कंपन्या नापास title=
(फोटो सौजन्य - Reuters)

आफ्रिकन देश गाम्बियामध्ये (gambia) एका भारतीय औषध (medicine) कंपनीचे खोकल्याचे सिरप (cough syrup) प्यायल्याने 66 मुलांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतीय कंपन्यांचे चार कफ सिरप घातक घोषित केले होते. यानंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात आणखी काही औषध कंपन्यांचे (pharma company) नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आलं आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने गेल्या महिन्यात जारी केलेल्या अहवालानुसार सुमारे 45 औषधांचे (medicine) नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले. निकृष्ट औषधांच्या नमुन्यांपैकी 13 हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) उत्पादन युनिटमधील आहेत. (samples of Paracetamol from manufacturing units in Himachal Pradesh failed dissolution test)

धक्कादायक बाब म्हणजे ज्या औषधांचे नमुने निकृष्ट आढळून आले आहेत त्यामध्ये पॅरासिटामॉलचा (Paracetamol) समावेश आहे. भारतात सर्रास पॅरासिटामॉल (Paracetamol) केला जातो. 'द ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, मे महिन्यात, सहाय्यक औषध नियंत्रक आणि परवाना प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडविरुद्ध तपास सुरु करण्यात आला होता. ग्लेनमार्कच्या टेलमिसार्टन (Telmisartan) (रक्तदाबासाठी वापरल्या जाणारे) हे औषध ड्रग्ज आणि कॉस्मेटिक्स अधिनियम 140, कलम 17B(E) अंतर्गत संशयास्पद आढळून आले होते. मोहालीस्थित या औषध कंपनीचे ऑफलोक्सासिन (Ofloxacin) आणि ऑर्निडाझोल (Ornidazole) अँटीबायोटिक औषधांचे नमुनेही चाचणीत उत्तीर्ण झाले नाहीत.

हिमाचलमधील अनेक उत्पादन युनिटमधून घेण्यात आलेल्या पॅरासिटामॉल चाचणीत निकृष्ट दर्जाच्या ठरल्या आहेत. ही विघटन चाचणी (Dissolution test) महत्त्वपूर्ण असून टॅब्लेट, कॅप्सूल, मलम इ. सारख्या औषधांमधून द्रावण तयार होण्याचे प्रमाण आणि दर मोजते. 

चंडीगढच्या औषध कंपनीने बनवलेले अँटिबायोटिक जेंटॅमिसिन इंजेक्शन (Gentamicin injection), बेक्टोरियल एंडोटॉक्सिन आणि स्टेरिलिटी हेही या चाचण्यांमध्ये निकृष्ट दर्जाचे आढळून आलेत. हिमाचलमधील काला एमबीच्या निक्सी लॅबोरेटरीजचे ऍनेस्थेसिया प्रोपोफोल (anaesthesia Propofol) हे औषधही गुणवत्ता चाचणीत फोल ठरली होती. पाच रुग्णांच्या मृत्यूनंतर चंदिगड पीजीआयएमईआर येथील आपत्कालीन वॉर्डमधून नमुना गोळा करण्यात आला. या सर्व रुग्णांना शस्त्रक्रियेपूर्वी हे वेदनानाशक औषध (anaesthesia) देण्यात आले होते. हिमाचलच्या फार्मास्युटिकल कंपनीला या बॅचची सर्व औषधे मागे घेण्यास सांगण्यात आले आहे.

ही औषधे ठरली निकृष्ट

Methycobalamin, Alpha Lipoic acid- USV Pvt Ltd. Baddi

Paracetamol Tablets - T&G Medicare, Baddi

Paracetamol Tablets-  Alco Formulation, Faridabad

Paracetamol Tablets-  ANG Lifesciences, Solan

Chlordiazepoxide-  Wockhardt, Nalagarh

Amoxicillin-Potassium Clavulanate-  Mediwell Bioteh solan

Vitamin D3 Chewable tablets- Maxtar Biogenics, Nalagarh

Ofloxacin and Ornidazole tablets- Amkon Pharmaceuticals, Mohali

Lvermectin dispersible Tablets- Plena Remedies, Baddi

Itraconazole Capsules- Theon Pharmaceuticals, Baddi

Gentamicin Injection- BM Pharmaceuticals, Chandigharh

Mefenamic acid tablets- Navkar Lifesciences, Baddi

Aluminium hydroxide- Biogenetic Drugs Pvt Ltd. Baddi