चालत्या ट्रेनमध्ये उतरला करंट, अनेक प्रवाशांना धक्का

गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वेच्या मागे लागलेला अपघातांचा ससेमीरा काही थांबण्याची चिन्हे नाहीत. आतापर्यंतचे अपघात कमी होते की काय, म्हणून त्यात आज आणखी एका धक्कादायक अपघाताची माहिती पुढे आली आहे. आता तर, धावत्या ट्रेनमध्येच वीजेचा प्रवाह (लाईट करंट) उतरला.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 13, 2017, 09:02 PM IST
चालत्या ट्रेनमध्ये उतरला करंट, अनेक प्रवाशांना धक्का title=

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वेच्या मागे लागलेला अपघातांचा ससेमीरा काही थांबण्याची चिन्हे नाहीत. आतापर्यंतचे अपघात कमी होते की काय, म्हणून त्यात आज आणखी एका धक्कादायक अपघाताची माहिती पुढे आली आहे. आता तर, धावत्या रेल्वेमध्येच वीजेचा प्रवाह (लाईट करंट) उतरला.

घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. पण, प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. दरम्यान, या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांना रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. ही घटना बिहारमधील साठाजगत रेल्वे स्टेशन नजीक मौर्या एक्सप्रेसमध्ये घडली. प्राप्त माहितीनुसार बछवाडा रेल्व स्टेशनवरून ट्रेन निघाल्यावर सकाळी सहाच्या दरम्यान, एका डब्यातील सीटखालून धूर निघू लागला. ज्यानंतर डब्यातील काही प्रवाशांना विजेचा धक्का (करंट) बसल्यासारखे जाणवले.

वीजेचा धक्का बसताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. यानंतर काही वेळातच ट्रेन थांबविण्यात आली. वीजेचा धक्का बसलेल्या तीन प्रवाशांना बेगुसराय रेल्वे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले.