राम राम सा ! सचिन पायटल यांचे नवे ट्विट

सचिन पायलट यांच्या आगामी राजकीय वाटचालीविषयी सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. 

Updated: Jul 14, 2020, 08:31 PM IST
राम राम सा ! सचिन पायटल यांचे नवे ट्विट title=

नवी दिल्ली: राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून गच्छंती झाल्यानंतर सचिन पायलट  Sachin Pilot यांनी आणखी एक नवे ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी आपल्याला पाठिंबा देणाऱ्या सर्व लोकांचे आभार आणि कृतज्ञता मानत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता सचिन पायलट यांच्या आगामी राजकीय वाटचालीविषयी सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. तत्पूर्वी आज दुपारी राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर सचिन पायलट यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या बायोमधील काँग्रेसचे नाव हटवले. यानंतर त्यांनी 'सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं' असे ट्विटही केले होते. 

महत्त्वाकांक्षा असण्यात गैर काय; प्रिया दत्त यांच्याकडून पायलटांची पाठराखण

सचिन पायलट भाजपमध्ये प्रवेश करण्याची किंवा स्वतंत्र पक्ष स्थापन करतील, अशी चर्चा आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यानंतर सचिन पायलट यांनीही पक्षाला रामराम ठोकल्याने आता काँग्रेस पक्षातील यंग ब्रिगेडमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. काँग्रेसच्या मुंबईतील नेत्या प्रिया दत्त यांनीही सचिन पायलट यांचे समर्थन करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

Rajasthan Crisis: काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपदावरून हटवल्यानंतर सचिन पायलटांनी उचलले मोठे पाऊल

माझ्या आणखी एका मित्राने पक्ष सोडला. सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे दोन्ही प्रचंड गुणवत्ता असलेले तरुण उमदे नेते होते. आमच्या पक्षाने हे दोन्ही नेते गमावले आहेत. महत्त्वाकांक्षी असण्यात काहीही गैर नाही, असे मला वाटते. सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य सिंधिया या दोघांनीही कठीण काळात पक्षासाठी मेहनत घेतली आहे, असे प्रिया दत्त यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. प्रिया दत्त यांच्या या एकूण ट्विटचा सूर हा ज्येष्ठांविषयी नाराजी व्यक्त करणार आहे. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये तरुण विरुद्ध ज्येष्ठ असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.