Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या निवासस्थानी मंगळवारी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP)सोहळा संपन्न झाला. या सोहळयात 11 बालकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar) प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर त्या 11 बालकांच्या शोर्याची कहानी समोर येत आहे. अशाच एका रोहन रामचंद्र बहिर या बालकाची देखील शोर्याची कहानी समोर आली आहे.नेमकं त्याने अशी काय कामगिरी केलीय, ज्यामुळे त्याला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आलाय, हे जाणून घेऊयात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 बालकांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. या सन्मानानंतर पंतप्रधानांनी एका-एका बालकाशी संवाद साधला होता. यानंतर त्यांनी या 11 पुरस्कार विजेत्या बालकांसोबत फोटो देखील काढला होता. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा देखील आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्या रोहन रामचंद्र बहिर (Rohan Ramchandra Bahir) याने कमी वयात खुप मोठे शोर्य दाखवले होते. त्यामुळेच त्याला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. खरं तर रोहनने एका महिलेचे प्राण वाचवले आहेत. एक महिला नदीत बुडत होती. ती स्वत:ला वाचवण्यासाठी आरडाओरड करत होती. तिची ही ओरड एकूण अवघ्या वयाच्या असलेल्या रोहनने (Rohan Ramchandra Bahir) क्षणाचाही विलंब न लावता नदीत उडी घेत महिलेचे प्राण वाचवले होते. विशेष म्हणजे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रोहनने महिलेचे प्राण वाचवले होते. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याला पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला आहे.
I am proud of Rohan Ramchandra Bahir, who jumped into a river and saved a woman from drowning. He displayed great bravery and fearlessness. Congratulations to him on being conferred the Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar. Best wishes to him for his future endeavours. pic.twitter.com/FPKaMpk7Th
— Narendra Modi (@narendramodi) January 24, 2023
रोहन रामचंद्र बहिर (Rohan Ramchandra Bahir) यांनी नदीत उडी घेऊन महिलेला बुडण्यापासून वाचवले. या दरम्यान त्यांनी प्रचंड शौर्य आणि निर्भयपणा दाखवली असल्याचे ट्विट करत पंतप्रधान मोदी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. तसेच मला तुझा अभिमान आहे रोहन रामचंद्र बहिर. तुम्ही एका महिलेला नदीत उडी मारून बुडण्यापासून वाचवले आहे. मी तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा देतो. खूप खूप अभिनंदन, असे देखील मोदी यांनी ट्विट करून म्हटलेय.