मोठी बातमी । भारतात ओमायक्रॉनचा धोका वाढला, संपर्कातील 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Omicron Pandemic​ : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटन ओमायक्रोनने (Omicron) भारतातही चिंता वाढवली आहे.  

Updated: Dec 3, 2021, 08:53 AM IST
मोठी बातमी । भारतात ओमायक्रॉनचा धोका वाढला, संपर्कातील 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह  title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : Omicron Pandemic : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटन ओमायक्रोनने (Omicron) भारतातही चिंता वाढवली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron) जगभरात आपले हातपाय परसरण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 23 देशांत याची दहशत निर्माण झाली आहे. देशात आता कर्नाटकातल्या ओमायनक्रॉनबाधितांच्या संपर्कातील 5 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं समोर आले आहे. या सर्वांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

ओमायक्रॉनबाधितांच्या संपर्कातील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तरी कुणालाही गंभीर लक्षणे नसल्याची माहिती कर्नाटकचे आरोग्यमंत्री  डॉ. के. सुधाकर यांनी दिली आहे. मात्र या सर्व जणांच्या जिनोम सिक्वेसिंग अहवाल अजून आलेला नाही. त्यामुळे त्यांनाही ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे की नाही हे अजून समजलेले नाही.  

कोरोनाच्या घातक ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत आणि विदेशातून येणाऱ्या विमान प्रवाशांसाठी राज्य सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार दक्षिण आप्रिका, बोत्सवाना आणि झिम्बाब्वे या तीन हाय रिस्क देशातून येणाऱ्यांना विमानतळावर RTPCR चाचणी सक्तीची करण्यात आली आहे तर दुसरीकडं देशांतर्गत विमान प्रवाशांना  RTPCR चाचणी बंधनकारक करण्याची अट आता रद्द करण्यात आली आहे. मात्र या प्रवाशांनी 72 तासांपर्यंतचं RTPCR टेस्ट निगेटिव्ह सर्टिफिकेट किंवा पूर्ण लसीकरण प्रमाणपत्र दाखवणं गरजेचं आहे.