इटलीतील एक व्हिडिओ शेअर करत ऋषी कपूर यांनी म्हटलं, 'अशी शिस्त पाहिजे'

लॉकडाऊन दरम्यान रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तीला इटली पोलिसांचा फटका

Updated: Mar 24, 2020, 10:19 AM IST
इटलीतील एक व्हिडिओ शेअर करत ऋषी कपूर यांनी म्हटलं, 'अशी शिस्त पाहिजे' title=

मुंबई : कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात 16 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही हा विषाणू आपले पाय वेगाने पसरवत आहे. पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त देशातील सर्व राज्य सरकारांनीही अनेक शहरे व जिल्ह्यात लॉकडाऊनसाठी सूचना दिल्या आहेत आणि लोकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. परंतु असे असूनही, बरेच लोकं अजूनही घराबाहेर पडत आहेत. परिस्थिती गंभीरपणे घेत नाही आहेत. अभिनेते ऋषी कपूर यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो जोरदार व्हायरल होत आहे.

इटलीच्या या व्हिडिओमध्ये असे दिसते की, लॉकडाऊन दरम्यानही एक व्यक्ती रस्त्यावर फिरत होती आणि पोलिसांसमोर उभी होती. त्यानंतर काही पोलीस मागून गाडीतून उतरले. एका पोलिसाने या व्यक्तीच्या पायावर लाथ मारली आणि तो तोंडावर पडला. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. इटलीमधील लॉकडाऊनच्या या व्हिडिओमध्ये पोलीस सोडून इतर कोणीही रस्त्यावर दिसत नाही. ऋषी कपूर यांनी इटलीचा हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले आहे की, 'आम्हाला याप्रमाणे शिस्तीची आवश्यकता आहे.'

कोरोनामुळे बहुतेक सेलिब्रिटी घरातच वेळ घालवत आहे. तसेच लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून घरातच राहण्याचं आवाहन ही करत आहेत. कोणी स्वयंपाक करतंय, कोणी पुस्तक वाचतंय तर कोणी वर्कआऊट करतंय. ऋषी कपूर टीव्हीवर ऑनलाइन योगाचे धडे घेताना दिसले होते आणि योगाद्वारे स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूर यांनी इंस्टाग्रामवर तीन व्हिडिओ शेअर केले आहेत, त्यावर आलिया भट्टने ही कमेंट केली आहे.