Indian Economy : Omicron चा धोका, अर्थव्यवस्थेबाबत RBIचे मोठे भाष्य

Coronavirus : कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनासह ओमायक्रॉनची (Omicron Coronavirus) संख्या झपाट्याने वाढत आहे. 

Updated: Dec 30, 2021, 12:07 PM IST
Indian Economy : Omicron चा धोका, अर्थव्यवस्थेबाबत RBIचे मोठे भाष्य title=
संग्रहित छाया

मुंबई : Coronavirus : कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनासह ओमायक्रॉनची (Omicron Coronavirus) संख्या झपाट्याने वाढत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. मुंबईत तिसरी लाट आल्याचे टास्क फोर्सने म्हटले आहे. इकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ओमायक्रॉन बाधितांचा आकडा वाढत आहे.  ओमायक्रॉनमुळे पुन्हा अर्थव्यवस्थेला (Economy) धोका निर्माण झाल्याचे मत भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) म्हटले आहे.(Omicron virus threatens economy against: RBI)

दरम्यान, ओमायक्रॉन, डेल्टामुळे जगात रूग्णसंख्या वाढीची त्सुनामी येणार आहे, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) व्यक्त केली आहे. तर मुंबईत तिसरी लाट सुरु झाली आहे, असा इशारा टास्क फोर्सने दिला आहे. आताची कोरोना परिस्थिती अर्थव्यवस्थेला (Indian Economy) बाधा पोहोचू शकते. आरबीआयने म्हटले आहे की, ओमायक्रॉनमुळे पुन्हा अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) अहवालात ओमायक्रॉनबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

दुसऱ्या तिमाहीपासून सुगीचे दिवस दिसत होते. आता ओमायक्रॉनमुळे पुन्हा विकासाला बाधा येण्याची भीती आरबीआयने (RBI) व्यक्त केली आहे. देशात कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.  देशात 24 तासांत ओमायक्रॉनचे 180 नवे रुग्ण आढळले आहेत.  देशात आतापर्यंत 961 ओमायक्रॉनग्रस्त आहेत. कोरोनाच्या रुग्णांमध्येही मोठी वाढ झाली आहे. 24 तासांत 13,154 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 

तर मुंबईत झपाट्याने रूग्णांची संख्या वाढत आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर मुंबईत तिसरी लाट सुरू झाली, असे डॉ. शशांक जोशी यांनी म्हटले आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत जवळपास 2500 रूग्ण आढळलेत. ही तिसरी लाट सुरु झाल्याचंच लक्षण आहे, असे डॉ. जोशी यांनी म्हटले आहे. अर्थात तिसरी लाट सुरू झाली असली तरी पॅनिकची गरज नाही, सर्वांनी काळजी घेणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग करणे गरजेचं आहे, असं डॉ. जोशी यांनी म्हटले आहे.