मुंबई : आपल्यापैकी असे लोक आहेत. जे भाड्याच्या घरात राहातात किंवा आपलं घर इतरांना भाड्यानं देतात. तुम्हाला माहितच असेल की यावेळी लोक भाडेकरार करतात. जो 11 महिन्यांसाठीचा असतो. परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का, की वर्ष हे 12 महिन्यांचं असतं. मग फक्त 11 महिन्यांसाठीच हा भाडे करार का केलं जातं? तो 12 महिन्यांसाठी का केला जात नाही? तर असे का होते याचे उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
असे फार कमी लोक आहेत, जे भाडे कराराला प्राधान्य देत नाहीत आणि भाडे करार न करता एकाच ठिकाणी दीर्घकाळ थांबतात. तर प्रथम आम्ही तुम्हाला असा सल्ला देतो की ही चूक तुम्ही कधीही करु नका. कारण यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते.
अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला भाडे करार म्हणजे काय आणि घरमालक आणि भाडेकरू या दोघांसाठी हे का महत्त्वाचे आहे हे सांगत आहोत. याशिवाय भाडे करार 12 महिन्यांऐवजी 11 महिन्यांसाठी का केलं जातं, यामागील कारण देखील सांगणार आहोत.
भाडे करार हा घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील करार आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, घरमालक आपली मालमत्ता एखाद्याला राहण्यासाठी किंवा कोणत्याही वापरासाठी मर्यादित काळासाठी भाड्याने देत आहे आणि त्यासाठी भाडे निश्चित केले आहे.
या करारामध्ये, भाडेकरू आणि घरमालक यांच्यामध्ये निश्चित केलेल्या अटी लिहिल्या जातात आणि या कराराद्वारे दोघेही काही अटींवर सहमत असतात. हे करार न्यायालयातही वैध आहे. ज्यामुळे घरमालक किंवा भाडेकरु कोणाचीही फसवणूक होणार नाही.
तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा कधी भाडेकरू, घरमालक किंवा दलाल यांच्याकडूनही भाडे करार करतात, तेव्हा तो करार केवळ 11 महिन्यांसाठी केला जातो. मग हा करार फक्त 11 महिन्यांसाठी का करतात?
तर भारतीय नोंदणी कायदा आहे. कलम 17 मध्ये काही कागदपत्रे देण्यात आली आहेत, त्यांची नोंदणी आवश्यक आहे आणि भाडेपट्टा कराराचाही त्यात उल्लेख आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की भाडे करार हा एक प्रकारे लीज डीड मानला जातो. त्यात असे म्हटले आहे की, जर एक वर्षापेक्षा जास्तचा तुम्ही करार केला असेल तर तुम्हालाही लीज डीड करावी लागेल. अशा परिस्थितीत भाडे करार 1 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सेल डीडची नोंदणी करावी लागेल.
परंतु हे लक्षात घ्या की सेल डीडनंतर त्याला शुल्क, मुद्रांक खर्च इत्यादी तुम्हाला भरावा लागू शकतो. अशा परिस्थितीत, हा खर्च टाळण्यासाठी, भाडे करार केवळ 11 महिन्यांसाठी केला जातो. यानंतर त्याचे नूतनीकरण केले जाते, परंतु 12 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी तो करार करत नाहीत.
कायदेतज्ज्ञ म्हणतात, घरमालकाच्या मालमत्तेवर कोणत्याही भाडेकरूचा कधीच अधिकार नसतो. परंतु काही परिस्थितींमध्ये भाड्याने राहणारी व्यक्ती त्यावर स्वतःचा हक्क गाजवू शकते.
मालमत्ता हस्तांतरण कायद्यानुसार, जर कोणतीही व्यक्ती 12 वर्षापेक्षा जास्त काळ कोणात्याही ठिकाणी भाड्याने राहात असेल, तर ती व्यक्ती त्या मालमत्तेवर आपला हक्क सांगू शकते.
परंतु जर घरमालक आणि भाडेकरु यासंदर्भात वेळोवेळी करार बनवत असेल, तर मात्र भाडेकरु देखील त्यावर आपलं हक्कं सांगू शकत नाही. त्यामुळे हे लक्षात घ्या की, भाडेकरु करार हे फार महत्वाचं आहे.