जसपूर : उत्तराखंडमधील एका गावात डायनासोर सदृश्य प्राण्याचा सांगाडा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नैनीतालपासून सुमारे ११० किमी अंतरावर असणाऱ्या जसपूर या गावातील असलेल्या विद्युत उपक्रेंद्रातील जुन्या भवनात हा डायनासोर सदृश्य प्राण्याचा सांगाडा सापडलाय.
शहराच्या फैज-ए-आम मार्गावरील विद्युत उपकेंद्रावरील भवन ३५ वर्ष जूनं आहे. त्या ठिकाणी बीलिंग काऊंटर बनविण्यासाठी रविवारी त्या भवनाची साफसफाई सुरू असताना विभागीय कर्मचाऱ्यांना हा सांगाडा आढळून आला.
प्राण्याच्या सांगाड्याची लांबी दोन फूट तर उंची एक फूट असल्याचं सांगितलं जातं आहे. जसपूरमध्ये सापडलेला प्राण्याचा हा सांगाडा हुबेहूब डायनासोर सारखा दिसतो. डायनासोरसारख्या दिसणाऱ्या प्राण्याची बोट जवळपास २९ सेमीची असून त्याची शेपूट ५ सेंमी आहे. या सांगाड्याला तपासणीसाठी डेहराडूनच्या वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.