पाटणा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्तीच्या मोहिमेला वेग आला आहे. परिसर हगणदारी मुक्त व्हावे यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत.
केवळ सरकारकडूनच नाही तर इतरही संघटनांकडून जागरूकता पसरवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, असं असलं तरी अनेकजण उघड्यावरच शौच करत आहेत.
उघड्यावर शौच करणाऱ्यांविरोधात बिहार प्रशासनाने एक अजब आदेश काढला आहे. या आदेशामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ब्लॉक विकास अधिकारी (बीडीओ) यांनी उघड्यावर शौच करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी त्यांचे फोटोज काढण्याचे आदेश दिले आहेत.
Bihar teachers told to click pictures of open defecation
Read @ANI Story | https://t.co/EHygF9Carn pic.twitter.com/NDeCL3lIDq
— ANI Digital (@ani_digital) November 22, 2017
बिहार टीचर असोसिएशनने बीडीओंच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. तसेच हा निर्णय म्हणजे शिक्षकांचा अपमान असल्याचंही म्हटलं आहे.
बिहारमधील औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने देव ब्लॉकमधील पवई पंचायत ३१ डिसेंबरपर्यंत हगणदारी मुक्त बनवण्याचं ठरवलं होतं. या संदर्भात नागरिकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी ६१ प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील जवळपास १४४ शिक्षकांवर जबाबदारी दिली होती.
जागरुकता पसरवल्यानंतरही नागरिक उघड्यावर शौच करत होते. त्यामुळे या नागरिकांचे फोटो काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र, प्रशासनाच्या या निर्णयाचा शिक्षकांनी विरोध केला.