ZEEL-Invesco Case: Zee सोबत विलीनीकरणाच्या प्रस्तावावर RIL कडून मोठं वक्तव्य

झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड (ZEEL) आणि इनव्हेस्को प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे. 

Updated: Oct 13, 2021, 11:05 PM IST
ZEEL-Invesco Case: Zee सोबत विलीनीकरणाच्या प्रस्तावावर RIL कडून मोठं वक्तव्य title=

मुंबई: झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड (ZEEL) आणि इनव्हेस्को प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे. याचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. इनवेस्कोने एक निवेदन जारी केलं आहे. त्यामध्ये जे म्हटलं आहे त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. इनवेस्कोच्या निवेदनानुसार ZEELला रिलायन्समध्ये विलीन करण्याचा प्रयत्न सुरू होता. आता रिलायन्सने या प्रकरणी एक निवेदनही जारी केलं आहे. 

रिलायन्सने आपल्या निवदेनात म्हटलं आहे की, त्याने आपल्या मीडिया प्रॉपर्टीजचं झीमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भागीदारीवर सहमती होऊ शकली नाही. प्राथमिक चर्चांमध्ये झालेल्या बोलणीनुसार पुनीत गोयनका हेच एमडी राहतील याबद्दल RIL कडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. इनव्हेस्कोच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना रिलायन्सने म्हटले आहे की, 'झी आणि इनव्हेस्कोमधील वादात नाव आल्याबद्दल दु:ख आहे. सध्या ज्या यासंबंधी कथित बातम्या येत आहेत त्यामध्ये तथ्य नाही. 

RIL ला इनव्हेस्कोकडून मदत

तज्ज्ञांच्या मते, या प्रकरणात इनव्हेस्कोची भूमिका अजूनही अस्पष्ट आहे. सेबी आणि इतर संस्थांनी आता या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. दरम्यान, रिलायन्सने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले की, फेब्रुवारी-मार्च 2021 मध्ये इनव्हेस्कोने रिलायन्सला RILचे प्रतिनिधी आणि झीचे प्रतिनिधी आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित गोयंका यांच्यात थेट बोलणी करण्यास मदत केली असं म्हटलं आहे.

 विलीनीकरणासंदर्भात मोठा प्रस्ताव

आम्ही झी सोबत मीडिया बिझनेससाठी विलीनीकरणाचा मोठा प्रस्ताव ठेवला होता. झी आणि सर्व संपत्तीचं योग्य मूल्यांकनही करण्यात आलं होतं. ZEE च्या सर्व शेअर धारकांचाही विचार करण्यात आला होता. सगळ्याचा विचार या प्रस्तावात करण्यात आला होता. 

पुनीत गोयंकाच राहावेत MD

रिलायन्सने नेहमीच गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांचे विद्यमान व्यवस्थापन चालू ठेवण्यावर विश्वास ठेवला आहे. तसंच चांगल्या कामगिरीसाठी RIL कडून नव्या गुंतवणूकदारांच्या व्यवस्थापनाला बढावा देण्यात आला आहे. त्यामुळे विलीनीकरणाच्या प्रस्तावात पुनित गोयनका यांना व्यवस्थापकीय संचालक (एमडी) म्हणून कायम ठेवण्यात येईल असे या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.