पिंपल फ्री स्कीनसाठी अशा पद्धतीनं वापरा लाल चंदन

तुम्ही मुरुमं दूर करण्यासाठी रामबाण उपचार शोधताय..ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Updated: Jul 25, 2022, 08:16 PM IST
 पिंपल फ्री स्कीनसाठी अशा पद्धतीनं वापरा लाल चंदन title=

BEAUTY TIPS :  लाल चंदन वापरल्याने त्वचेला थंडावा मिळतो. लाल चंदनाच्या वापर सौंदर्य प्रसाधनांमध्ये याचा वापर होतो.लाल चंदनामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्वचेवरील डाग, मुरुम इत्यादी समस्या दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो.  दुसरीकडे, जर तुम्ही मुरुमं दूर करण्यासाठी रामबाण उपचार शोधत असाल तर तुम्ही लाल चंदन वापरू शकता. चला तर मग जाणुन घेऊया लाल चंदन वापरण्याचे काय फायदे आहेत 

अशा प्रकारे वापरा लाल चंदन-

लाल चंदन पेस्ट

पाण्यात लाल चंदन बारीक करून पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट स्वच्छ चेहऱ्यावर मुरुमं आलेल्या भागावर लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. लाल चंदनाची पेस्ट लावल्याने त्वचेवरील सूजही दूर होते. मुरुमांच्या ठिकाणी सूज किंवा वेदना जाणवत असल्यास लाल चंदनाचा वापर फायदेशीर ठरेल.

लाल चंदन आणि हळदीचा वापर

मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी लाल चंदनाच्या पावडरमध्ये हळद मिसळून मुरुमांवर लावा. असे केल्याने तुम्हाला आराम मिळेल आणि पुरळ बरे होईल. 

लिंबाचा रस आणि कापूर

दुसरीकडे, लाल चंदनाच्या पावडरमध्ये लिंबाचा रस आणि कापूर मिसळल्याने मुरुमांच्या भागात खाज येण्याच्या समस्येपासून देखील आराम मिळेल.

लाल चंदन पावडर आणि खोबरेल तेल

तुम्ही लाल चंदन पावडर खोबरेल तेलात मिसळून मुरुमांवर लावू शकता. १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.यामुळे मुरुमं बरी होऊ शकतात.  

कडुनिंब आणि लाल चंदन

लाल चंदन पावडर बारीक करून पावडर बनवा.  त्या पावडरमध्ये कडुनिंबाच्या पानांची पेस्ट आणि गुलाबपाणी मिसळून चेहऱ्याला लावा. १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. 

( येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. zee24 Taas याची पुष्टी करत नाही.)