India Post Recruitment 2021 | 10वी पास तरुणांसाठी पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी, आत्ताच अर्ज करा

 पोस्टात (India Post Recruitment 2021) 10 वी पास असलेल्या तरुण तरुणींसाठी नोकरीची संधी आहे. 

Updated: Aug 30, 2021, 04:19 PM IST
India Post Recruitment 2021 | 10वी पास तरुणांसाठी पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी, आत्ताच अर्ज करा title=

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी गूड न्यूज आहे. पोस्टात 10 वी पास असलेल्या तरुण तरुणींसाठी नोकरीची संधी आहे. भारतीय पोस्ट विभागाने पोस्ट (India Post)  डाक सेवक (Gramin Dak Sevak) या पदासाठी भरती (India Post Recruitment 2021) सुरु केली आहे. एकूण 4 हजार 845 जागांसाठी भरती करणार आहे. इच्छुक उमेदवार पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ही भरती केवळ उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांसाठी आहे. या भरतीसाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 23 ऑगस्टपासून सुरु करण्यात आली आहे. उमेदवारांची निवड ही मेरिटच्या आधारे करण्यात येणार आहे. (Recruitment for a total of 4845 posts of Gramin Dak Sevak in Indian Post Department, know how to apply)

कोणत्या राज्यात किती जागांसाठी भरती होणार? 

यूपीमध्ये डाक सेवक पदासाठी एकूण 4 हजार 264 जागांसाठी तर उत्तराखंडमध्ये 581 जागांसाठी ही भरती असणार आहे. जीडीएस या पदासाठी एकूण 4 हजार 845 जागांसाठीची ही भरती आहे. याबाबतची सविस्तर माहिती ही पोस्टाच्या वेबसाईटवर मिळेल. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी 23 ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली. तर 22 सप्टेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.  

निकष आणि वयोमर्यादा किती? 

जीडीएस पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 10 वी पास हवा. 10 वीला इंग्रजी आणि गणित या विषयांचा समावेश असावा. या पदासाठी 18 ते 40 वयादरम्यानचे उमेदवार अर्ज करु शकतात. 

अर्ज शुल्क किती? 

ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क द्यावे लागणार आहे. तर एससी, एसटी, दिव्यांग तसेच सर्व प्रवर्गातील महिलांना कोणत्याही प्रकारे शुल्क भरावे लागणार नाही. हे शुल्क कोणत्याही पोस्ट ऑफीसमधून ई चलनाच्या माध्यामातून जमा करता येईल.  

अर्ज कसा करायचा?

या पदासाठी अर्ज करण्यासाठी पोस्टाच्या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर https://appost.in/gdsonline या लिंकवर क्लिक करावं. त्यानंतर पुढील सर्व प्रक्रिया कशी करायची याबाबतची माहिती मिळेल.