घरबसल्या PAN कार्ड बनवण्यासाठी वाचा या खास टीप्स; काही मिनिटात कार्ड तुमच्या हातात

अनेक आर्थिक कामांसाठी पॅन कार्ड ही गरजेची गोष्ट आहे. पॅन कार्ड बनवण्यासाठी आता पूर्वी सारखी मेहनत घेण्याची गरज नाही

Updated: May 23, 2021, 08:09 PM IST
घरबसल्या PAN कार्ड बनवण्यासाठी वाचा या खास टीप्स; काही मिनिटात कार्ड तुमच्या हातात title=

मुंबई :  अनेक आर्थिक कामांसाठी पॅन कार्ड ही गरजेची गोष्ट आहे. पॅन कार्ड बनवण्यासाठी आता पूर्वी सारखी मेहनत घेण्याची गरज नाही. आता पॅन कार्ड फक्त एका क्लिक वर तुमच्या हातात येणार आहे. तुम्ही आधार नंबरच्या मदतीने काही मिनिटात पॅन जनरेट करू शकता. 

पॅन कार्ड इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून जारी करण्यात येते. ज्यात 10 अंकांचा अल्फान्युमरीक असतो. पॅन कार्ड अप्लाय करणाऱ्यांना 10 मिनिटांच्या आत पीडीएफ फॉर्मटमध्ये जारी केला जातो.

नवीन पॅनकार्ड मिळवण्यासाठी आपल्याला इनकम टॅक्सची वेबसाइटवर लॉग इन करावं लागेल. त्यानंतर पॅन कार्डला अप्लाय करण्यासाठी 12 अंकी आधार नंबर द्यावा लागेल. यासाठी मोबाईल नंबर आधार क्रमांकाला लिंक असणे गरजेचे आहे. मोबाईल वरून केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आलेला ओटीपी सबमिट करणे गरजेचे राहिल.

मिनिटांमध्ये बनवा पॅन कार्ड
1 इनकम टॅक्सच्या ई फाइलिंग पोर्टलवर जा
2Instant PAN through Aadhaar वर क्लिक करा
3 Get new PAN वर सिलेक्ट करा
4 Captcha कोड टाकून आल्या आधारला लिंक असललेल्या मोबाईल नंबरवर  ओटीपी जनरेट करा 
5 ओटीपी वेरिफाईड करा आणि आधार डिटेल वेरिफाईड करा

असे डाऊनलोड करा
तुम्ही PAN कार्ड PDF फॉर्मटमध्ये डाऊनलोड करू शकता. त्यासाठी चेक स्टेटस वर डाऊनलोड पॅन वर क्लिक करा. त्यानंतर आधार क्रमांक नमूद करा.

आपला आधार क्रमांक ज्या ईमेल आयडीवर लिंक आहे. त्यावर पीडीएफचा मेल प्राप्त होईल.