इनकम टॅक्स वाचवायचा असेल तर तुमच्या बायकोची होऊ शकते मदत, या गोष्टी जाणून घ्या आणि दुप्पट फायदा मिळवा

तुमची पत्नी तुम्हाला इनकम टॅक्स वाचवण्यासाठी मदत करू शकते.

Updated: May 23, 2021, 06:58 PM IST
इनकम टॅक्स वाचवायचा असेल तर तुमच्या बायकोची होऊ शकते मदत, या गोष्टी जाणून घ्या आणि दुप्पट फायदा मिळवा title=
representative image

तुमची पत्नी तुम्हाला इनकम टॅक्स वाचवण्यासाठी मदत करू शकते. बहुतेक तुम्हाला माहित नसेल की, भारत सरकारने महिलांबाबत वेगळा आणि विशेष नियम बनवला आहे. ज्याद्वारे नवऱ्याला टॅक्समध्ये सूट मिळून दुप्पट फायदा होऊ शकतो वाचा ते कसे

1 आरोग्य विमा
कोरोना काळात प्रत्येकजण आरोग्य विमा काढत आहे. हा एक समजदारीचा निर्णय आहे. परंतु आरोग्य विमा महागड्या खर्चाला वाचवण्यासोबतच तुमचा टॅक्सदेखील वाचवू शकतो. जर तुम्ही 60 वर्षापेक्षा कमी वयाचे आहात तर आरोग्य विमाच्या माध्यमातून तुम्ही 25 हजारापर्यंत रक्कम वाचवू शकता. तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांचे प्रीमियम करू शकता. त्यामुळे सेक्शन 80 डी च्या माध्यमातून सूट मिळू शकते. यामध्ये आपण मेडिक्लेम, फॅमिली फ्लोटर घेऊ शकतो. जर तुमचे वय 60 वर्षाहून अधिक आहे. तर तुम्हाला 50 हजारापर्यंत टॅक्स बेनिफिट मिळू शकतो.

2. संयुक्त गृह कर्ज

टॅक्स वाचवण्याचा आणखी सोपा पर्याय गृहकर्ज हा आहे. जर तुम्ही जॉइंट गृहकर्ज केले तर, हफ्ता भरणाऱ्यांना टॅक्समध्ये सूट मिळते. सेक्शन 80 सी अंतर्गत 1.5 लाखापर्यंतचे डिडक्शन मिळते. व्याजाच्या रकमेवर सेक्शन 24 अंतर्गत 2 लाखांपर्यंत सूट मिळते.

3. जीवन विमा
टॅक्स वाचवण्याचा सर्वात सोपा मार्ग जीवन विमा देखील आहे. शेवटच्यावेळी टॅक्स प्लॅनिंग करण्यासाठी बहुतांष लोकं हेच  करतात. जर तुम्ही ज्वाइंट स्वरूपात वीमा पॉलिसी घेत असाल तर तुम्हाला सेक्शन 80 सी अंतर्गत इनकम टॅक्समध्ये सूट मिळू शकते.

4. शिक्षण कर्ज
इनकम टॅक्स कायदाच्या सेक्शन 80 अंतर्गत तुम्हाला मुलांच्या शिक्षणावर होणाऱ्या दीड लाखापर्यंतच्या खर्चावर डिडक्शनचा फायदा घेता येतो. परंतु डिडक्शनचा फायदा फक्त दोन मुलांपर्यंत घेता येईल. हा टॅक्स नवरा बायको दोघांनी वाटून घेतल्यास क्लेमची रक्कम वाढवता येऊ शकते.

5. लीव्ह ट्रॅव्हल टॅक्स
एक करदाता चार वर्षात दोन प्रवासांसाठी सूट्या तसेच ट्रॅव्हल अलाऊंसच्या सूविधा घेऊ शकतो. जर पती आणि पत्नी दोन्ही करदाते असतील तर दोन्ही मिळून 4 वर्षात 4 ट्रॅव्हल अलाऊंसचा फायदा घेऊ शकता. याप्रकारे ते 2 च्या ऐवजी 4 वेळा हॉलिडेला जाऊ शकतात.