RBI कडून दोन बड्या बँकांवर दंडात्मक कारवाई; खातेधारकांवर काय होणार परिणाम?

RBI penalty on Banks:अनेकांचे Saving Account इथेच... तुम्हीही इथं खातं सुरु केलं आहे का?  पाहा तुमच्या पैशांवर काय परिणाम होणार...   

सायली पाटील | Updated: Mar 14, 2024, 09:02 AM IST
RBI कडून दोन बड्या बँकांवर दंडात्मक कारवाई; खातेधारकांवर काय होणार परिणाम?  title=
RBI penalty on Bandhan Bank Bank of India know latest update

RBI penalty on Banks: देशातील अनेक बँका आणि पतसंस्थांच्या व्यवहारांसह अनेक आर्थिक व्यवहार आणि उलाढालींवर आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँक लक्ष ठेवून असते. कुठंही गैरव्यवहार किंवा तत्सम प्रकार आढळल्यास किंवा एखाद्या संस्थेकडून आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली झाल्यासही आरबीआयकडून कठोरातील कठोर कारवाई करण्यात येते. सध्या अशीच कारवाई देशातील दोन मोठ्या बँकांवर करण्यात आली आहे. 

(Reserve bank of india) आरबीआयकडून बँक ऑफ इंडिया  (Bank of India) आणि बंधन बँक (Bandhan Bank) या दोन्ही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. काही नियमांचं पालन न केल्यामुळं बँकांवर ही कारवाई करत दंड ठोठावण्यात आल्याचं आरबीआयकडूनच स्पष्ट करण्यात आलं आहे. उपलब्ध माहितीनुसार आरबीआयनं बँक ऑफ इंडियाला आरबीआयनं 1.4 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर, बंधन बंकेवर 29.55 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

कारवाईमागं अनेक कारणं... 

ठेवीवरील व्याजदर, बँकेतील ग्राहक सेवा, कर्जावर व्याजदर यासह क्रेडिट सूचना कंपनी नियम 2006 मधील तरतुदींचं उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेनं कारवाईचं पाऊल उचललं. इतकंच नव्हे तर, इंडोस्टार कॅपिटल फाइनॅन्स लिमिटेडला RBI नं एनबीएफसी दिशा निर्देश 2016 अंतर्गत केवायसी निर्देशांत नमूद करण्याक आलेल्या नियमावलीचं पालन न करण्यासह इतर काही महत्त्वाच्या कारणांसाठी 13.60 लाखांचा दंड ठोठावला आहे. 

हेसुद्धा वाचा : Weather Update : राज्यातील कमाल तापमान 40 अंशांवर; तरीही 'इथं' मात्र  पावसाचा इशारा 

देशातील बहुतांश बँकांवर आरबीआयनं आतापर्यंत कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये एसबीआय, कॅनरा बँक, सिटी युनियन बँकांचाही समावेश आहे. दरम्यान, या बँकांमधील खातेधारकांच्या खात्यांवर, किंवा त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या ठेवीवर या कारवाईमुळं कोणताही परिणाम होणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात येत आहे.