नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियान लवकरच २० रुपयाची नवी नोट आणणार आहे. महात्मा गांधी (न्यू) सीरीजमध्ये छापल्या जाणाऱ्या या नोटवर गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असणार आहे. रिझर्व बँकने म्हटलं की, '२० रुपयाची ही नवी नोटी हिरव्या आणि पिवळ्या रंगात असेल. नोटेच्या मागे सांस्कृतिक वारसा दर्शवणारी एलोराच्या गुफेचं चित्र असणार आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटलं की, २० रुपयाची आधीची नोट देखील व्यवहारात वापरली जाईल. नव्या नोटेचा आकार 63mmX129mm असेल.
1. सी थ्रू रजिस्टरमध्ये २० रुपये लिहिलेलं असेल.
2. देवनागरी लिपीत २० आकडा लिहिलेला असेल.
3.मध्यभागी महात्मा गांधी यांचा फोटो असेल.
4. मायक्रो लेटर्समध्ये RBI,भारत, INDIA आणि '20'
5. सुरक्षेच्या तारेवर 'भारत' आणि 'RBI'
6. गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी
7. अशोक स्तंभ
1. नोट छापल्याचं वर्ष
2. स्वच्छ भारतचा लोगो आणि स्लोगन
3. भाषा पट्टी
4. एलोरा गुफेचं चित्र
5. देवनागरीमध्ये २० अंक