'या' रंगाच्या रेशन कार्ड धारकांसाठी गोड बातमी; सरकारची दिवाळी भेट

Ration Card : राज्य सरकारने 20 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत ऑगस्टसाठी रेशन वितरणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ऑक्टोबरमध्ये कार्डधारकांना सवलतीच्या दरात साखरेचेही वाटप करण्यात येणार आहे.

Updated: Oct 20, 2022, 11:27 AM IST
'या' रंगाच्या रेशन कार्ड धारकांसाठी गोड बातमी; सरकारची दिवाळी भेट  title=

Ration Card : रेशन कार्ड हे सरकारने दिलेला एक राहण्याचा अधिकृत पुरावा आहे. रेशन कार्ड (ration card ) हे सर्वसामान्य नागरीकांचे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. सरकार रेशन कार्डावर गरीबांना स्वस्त किंमतीत धान्य उपलब्ध करुन देत असते. त्याचबरोबर कोरोना महामारीतही सरकारने मोफत रेशन दिले आहे. ती योजना सध्याही सुरू आहे. याचा फायदा शिधापत्रिकाधारकांना होतो. याचपार्श्वभूमीवर सरकाने यूपीच्या योगी सरकारने शिधापत्रिकाधारकांना दिवाळी (diwali 2022) भेट दिली आहे. 

दरम्यान दिवाळीनिमित्त मिठाई बनवण्यासाठी सरकार शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात साखर (suger price) उपलब्ध करून देणार आहे. यूपीमध्ये (UP Government) ऑगस्ट महिन्यासाठी रेशनचे वितरण 20 ऑक्टोबरपासून मोफत सुरू होणार आहे. यावेळीही लाभार्थ्यांना गव्हाऐवजी तांदूळ देण्यात येणार आहे.

या कालावधीत रेशन वितरण होणार 

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीनंतर (Uttar Pradesh Assembly elections ) रेशन वितरणाचा काळ बिघडला असून ऑगस्ट महिन्याचे रेशन सरकारकडून ऑक्टोबर महिन्यात वितरित केले जाईल. 20 ऑक्‍टोबर ते 31 ऑक्‍टोबर या कालावधीत ऑगस्टसाठी रेशन वाटपाचे काम पूर्ण करण्याचे आदेश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. ऑक्टोबरमध्ये कार्डधारकांना सवलतीच्या दरात साखरेचेही वाटप करण्यात येणार आहे.

वाचा : ‘या’ लोकांवर नसते आई लक्ष्मीची कृपा; यांना नेहमी असते पैशांची कमरता

3.6  कोटी शिधापत्रिकाधारक

शिधावाटप करताना एका युनिटवर 5 किलो तांदूळ (free Rice) मोफत देण्याची तरतूद आहे. यावेळी शासनाकडून अंत्योदय कार्डधारकांना (Antyodaya card holders) तीन किलो साखरही दिली जाणार आहे. साखर 18 रुपये किलो दराने मिळणार आहे. उत्तर प्रदेशात अंत्योदय कार्डधारकांची संख्या सुमारे 41 लाख आहे. याशिवाय पात्र घरगुती शिधापत्रिकाधारकांची संख्या3.18 कोटी आहे.

उत्तर प्रदेश सरकारने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले आहे की, राज्यातील सर्व रेशन दुकानदारांच्या वतीने 20 ऑक्टोबरपासून रेशनचे वितरण सुरू केले जाईल. ही वितरण प्रक्रिया 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. या वितरणात लाभार्थ्यांना गव्हाऐवजी तांदूळ देण्यात येणार आहे. 19 ऑक्टोबरपर्यंत तांदूळ आणि साखर दोन्ही रेशन दुकानांवर उपलब्ध करून दिली जाणार आहेत.