Ram Mandir Pran Pratishtha : अखेर 500 वर्षांची प्रतिक्षा संपली असून अयोध्येच्या राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पुजा संपन्न झाली. हा ऐतिहासिक क्षण संपूर्ण जगाने अनुभवला. प्राण प्रतिष्ठआ सोहळ्यानतंर पीएम मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं. 22 तारीक ही फक्त तारीख नाही तर 22 तारखेपासून नव्या कालचक्राची सुरुवात झाली आहे. हा अलौकीक क्षण असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. पीएम मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात 'सियावर रामचंद्र की जय...' म्हणत केली. आज आपले राम आले आहेत. या शुभ प्रसंगी तुम्हा सर्वांना आणि तमाम देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. या अद्भूत सोहळ्याचा साक्षीदार म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे, सांगण्यासारख खूप काही आहे पण माझा कंठ दाटून आला आहे असं पीए मोदींनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'आजपासून हजार वर्षांनंतरही लोक या तारखेबद्दल, या क्षणाबद्दल बोलतील. रामाची एवढी मोठी कृपा आहे की आपण सर्वजण हा क्षण जगत आहोत आणि हे प्रत्यक्षात घडताना पाहत आहोत' 'मी या क्षणी दैवी अनुभव घेत आहे... मी भगवान श्री रामाची माफी मागतो. आपल्या प्रयत्नात काहीतरी उणीव असावी, म्हणूनच आपण हे काम शतकानुशतके करू शकलो नाही पण आज ही उणीव भरून निघाली आहे...भगवान राम आपल्याला नक्कीच क्षमा करतील' असं पीएम मोदी म्हणाले.
आमचा राम लल्ला आता तंबूत राहणार नाही, तो आता मंदिरात राहणार आहे. हा क्षण अलौकिक आहे, हे वातावरण, हा क्षण आपल्या सर्वांवर प्रभू श्री रामाचा आशीर्वाद आहे. राम आग नाही, उर्जा आहे., राम वाद नाही, समाधान आहे. राम विचार आहे, राम विधान आहे, देशाता आता निराशेला स्थान नाही. राम भारताची चेतना आहे, राम भारताचं चिंतन आहे. राम भारताची प्रतिष्ठा आहे, राम भारताचा प्रताप आहे. राम प्रभाव आहे, राम प्रवाह आहे. राम नेती आहे, राम निती आहे. राम नित्यतासुद्धा आहे, राम निरंतरतासुद्धा आहे. राम व्यापक आहे. विश्व आहे. विश्वात्मा आहे. त्यामुळेच रामाचा प्रभवा हजारो वर्षापर्यंत राहातो अशा शब्दीत पीएम मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आपल्ल्याला आता झुकायचं नाही, थांबायचं नाही, भारताला विकसित आणि वैभवशाली बनवूया असं आवाहन पीए मोदी यांनी यावेळी केलं. आज आपल्याला प्रभू रामाचे मंदिर मिळाले आहे. गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर येत आज सर्व दिशा देवत्वाने भरलेल्या आहेत. मी जानकी, भरत आणि लक्ष्मण मातेला नमस्कार करतो असं पीए मोदींनी सांगितलं.