लखनऊ : कोरोनाचे संकट देशात असताना लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत राम मंदिराचे काम सर्व नियम पाळून करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राम मंदिराचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामाचा एक भाग म्हणून ११ मेपासून राम जन्मभूमी परिसरात जमीन सपाटीकरणाचे काम सुरु करण्यात येत आहे. या कामाच्या ठिकाणी प्राचीन मंदिराचे अवशेष सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.
राममंदिराच्या बांधकामाला सुरूवात झाली आहे. मात्र या बांधकामा दरम्यान जमिनीचे समतलीकरण करताना चुन्याच्या दगडावर केलेली प्राचीन शिल्प आणि एक शिवलिंग सापडले आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे चंपतराय यांनी ही माहिती दिली आहे.
गेल्या १० दिवसांपासून ही जागा मंदिर बांधण्यासाठी योग्य करण्यासाठी समतलीकरण केले जात आहे. यावेळी केलेल्या खोदकामात काही जुने खांब, शिल्प आढळली आहेत. या खोदकामा दरम्यान सापडलेलं शिवलिंग आणि कुबेर टीला भागात आढळलेले शिवलिंग एकाच प्रकारचं आहे, असे संपतराय यांनी म्हटले आहे.
सोशल डिस्टंसिंग पाळून इथे बांधकाम सुरु आहे. याठिकाणी बांधकाम करताना, योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. राममंदिराचं बांधकाम करण्यासाठी हजारो मजूर कामाला लागले आहेत.