'या' आलिशान महालात राहतात शेअर मार्केटचे 'बिग बुल' Rakesh Jhunjhunwala

2013 मधील या व्यवहारानंतर त्यांनी 2019 मध्ये उरलेले सात मजले खरेदी केले. राकेश आणि त्यांची पत्नी यांनी हा व्यवहार केला.   

Updated: Feb 15, 2022, 10:55 AM IST
'या' आलिशान महालात राहतात शेअर मार्केटचे 'बिग बुल' Rakesh Jhunjhunwala   title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : भारतीय शेअर मार्केटमध्ये दमदार कामगिरी करत अनेकांना थक्क करणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांची तुलना आता अंबानींशी होऊ लागली आहे. शेअर मार्केटमध्ये असणारा त्यांचा दबदबा कोणीही नाकारू शकत नाही. (share Market)

झुनझुनवाला यांनी मुंबईतील एक इमारत दोनदा खरेदी केली. सूत्रांच्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात त्यांनी इमारतीचे सात मजले खरेदी केले. (Rakesh Jhunjhunwala )

2013 मधील या व्यवहारानंतर त्यांनी 2019 मध्ये उरलेले सात मजले खरेदी केले. राकेश आणि त्यांची पत्नी यांनी हा व्यवहार केला. 

इमारतीच्या 12 व्या मजल्यावर ड्रेसिंग रुम, लिविंग एरिया, बाल्कनी आणि सलून अशा सर्व सुविधा आहेत. 

दो बार में खरीदी थी पूरी बिल्डिंग

इमारतीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर स्टोरेज आणि बेडरुम अशा खोल्या आहेत. तर चौथ्या मजल्यावर पाहुण्यांची खोली आहे. 

10 व्या मजल्यावर कुटुंबाला एकत्र येऊन वेळ घालवण्यासाठीची खोली आहे. इथं पुजेची खोली, स्वयंपाकघर आणि लिविंग रुम आहे. 

 

इमारतीच्या 14 व्या मजल्यावर स्विमिंग पूल, पिझ्झा काऊंटर, भाज्यांची बाग, आऊटडोअर टेरेस , रिहीटींग टेरेस अशा सुविधा आहेत. 

अतिशय सुसज्ज अशा या घरात झुनझुनवाला त्यांच्या कुटुंबासमवेत राहतात. आहे की नाही, हेवा वाटण्याजोडी ही जीवनशैली  ?