Rakesh Jhunjhunwala यांची 'या' स्टॉकमध्ये आणखी मोठी गुंतवणूक, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?

Rakesh Jhunjhunwala Port शेअर मार्केटचे बिगबुल म्हणून ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या पोर्टफोलिओमधील Jubilant Pharmova ltd या शेअरमध्ये आणखी गुंतवणूक वाढवली आहे.

Updated: Apr 19, 2022, 03:17 PM IST
Rakesh Jhunjhunwala यांची 'या' स्टॉकमध्ये आणखी मोठी गुंतवणूक, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? title=

मुंबई : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या पोर्टफोलिओमधील फार्मा स्टॉक Jubilant Pharmova ltd मध्ये आपली गुंतवणूक आणखी वाढवली आहे. त्यांनी ही गुंतवणूक एकूण 6.3 टक्क्यांनी वाढवून 6.8 टक्के केली आहे.  Jubilant Pharmova ltd ही फार्मा सेक्टरमधील प्रसिद्ध कंपनी आहे. राकेश झुनझुनवाला यांची टेक, फायनान्स, रिटेल आणि फार्मा स्टॉक्सवर नेहमीच लक्ष असते. त्यांच्या पोर्टफोलिओला अनेक गुंतवणूकदार फॉलो करतात.

राकेश झुनझुनवाला यांनी वाढवली गुंतवणूक

BSE वर मार्च 2022 च्या तिमाहीचा शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार राकेश झुनझुनवाला आणि पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी Jubilant Pharmova ltd मध्ये गुंतवणूक वाढवल्याची माहिती मिळत आहे. मार्च 2022 पर्यत त्यांनी या कंपनीत 0.5 टक्क्यांनी गुंतवणूक वाढवली आहे.

राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पोर्टफोलिओमध्ये 35 स्टॉक्स आहेत. या स्टॉक्स नेटवर्थ 33 हजार 225 कोटी रुपये इतकी आहे. झुनझुनवाला यांना भारताचे वॉरेन बफेट देखील म्हटले जाते. Jubilant Pharmova ltd शिवाय त्यांनी कॅनेरा बँक आणि NCCमध्येही गुंतवणूक वाढवली आहे.