Rakesh Jhunjhunwala यांना या शेअरने दिला छप्परफाड पैसा; एका महिन्यात 832 कोटींचा नफा

Rakesh Jhunjhunwala Portfolio:  एका महिन्यात स्टार हेल्थच्या शेअरची किंमत 686.60 रुपयांवरून 741.10 रुपये प्रति शेअर झाली. मेट्रो ब्रँडच्या शेअरची किंमत 531.95 रुपयांवरून 604 रुपये झाली.

Updated: Apr 5, 2022, 07:47 AM IST
Rakesh Jhunjhunwala यांना या शेअरने दिला छप्परफाड पैसा; एका महिन्यात 832 कोटींचा नफा title=

मुंबई : Rakesh Jhunjhunwala Portfolio: शेअर बाजारातील काही शेअर्सने गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा मिळवून दिला आहे. भारतीय शेअर बाजारातील बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांच्या दोन शेअर्सने त्यांना गेल्या महिनाभरात कोट्यवधींचा परतावा मिळवून दिला.  झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या स्टार हेल्थ आणि मेट्रो ब्रँडने त्यांच्या कमाईत 832 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात दोन्ही शेअर्समध्ये चांगली तेजी नोंदवली गेली.

एका महिन्यात स्टार हेल्थच्या शेअरची किंमत 686.60 रुपयांवरून 741.10 रुपये प्रति शेअर झाली. शेअरमध्ये सुमारे 54.50 रुपयांची वाढ दिसून आली. तसेच, मेट्रो ब्रँडच्या(Metro Brands share price) शेअरची किंमत 531.95 रुपयांवरून 604 रुपयांपर्यंत वाढली. या शेअरमध्ये सुमारे 72.05 रुपयांची वाढ झाली.

राकेश झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ

दोन्ही शेअर्सच्या तेजीमुळे राकेश झुनझुनवाला यांच्या एकूण संपत्तीत 832 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. झुनझुनवाला यांचा स्टार हेल्थमध्ये (Star Health Share price) एकूण 17.50% हिस्सा आहे. शेअरची किंमत 54.50 रुपयांनी वाढली आहे. एकूण शेअर्सची संख्या 10,07,53,935 आहे.

जर आपण एका महिन्याच्या व्यवहारावर नजर टाकली तर राकेश झुनझुनवाला यांनी एकूण नेटवर्थमध्ये 550 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला.