T20 World Cup: 'ते' 7 रन नसते मिळाले तर भारत पाकिस्तानविरुद्धची मॅच हरला असता; विजयाचे 'खरे हिरो' वेगळेच

India Win Against Pakistan Thanks To This Partnership: भारतीय संघाच्या विजयाचं श्रेय ऋषभ पंत आणि गोलंदाजांपैकी जसप्रीत बुमराह तसेच हार्दिक पंड्याला दिलं जात असलं तरी एकंदरित विचार केला तर सामन्याचे खरे हिरो वेगळेच खेळाडू आहेत असं लक्षात येतं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 10, 2024, 09:53 AM IST
T20 World Cup: 'ते' 7 रन नसते मिळाले तर भारत पाकिस्तानविरुद्धची मॅच हरला असता; विजयाचे 'खरे हिरो' वेगळेच title=
भारताने हा रोमहर्षक सामना जिंकला

India Win Against Pakistan Thanks To Those 7 Runs: भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धचा टी-20 वर्ल्ड कपमधील आपला रेकॉर्ड रविवारी अधिक मजबूत करत आपल्या खात्यात आणखीन एका विजयाची नोंद केली. मात्र न्यूयॉर्कमधील नासो इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात भारतीय संघाला अपयश आलं. तरीही गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने विजय मिळवला. या विजयाचं श्रेय फलंदाजीमध्ये ऋषभ पंतला दिलं जात आहे. भारतीय फलंदाजांपैकी केवळ ऋषभ पंतने 42 धावांची खेळी करत कडवी झुंज दिली. पंतने 31 बॉलमध्ये 42 धावा केल्या. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्याचं या विजयानंतर कौतुक केलं जात आहे. मात्र केवळ 6 धावांनी हा सामना जिंकवण्यामध्ये या दोनच गोलंदाजांनी योगदान दिलेलं नाही. तर भारताच्या फलंदाजीच्या क्रमवारीतील तळाच्या फलंदाजांनी केलेल्या पार्टरनशीपमुळेच भारताने विजय मिळवला असं एकंदरित स्कोअरकार्ड पाहिल्यावर लक्षात येतं. 

भारतीय फलंदाजीची पडझड

पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताला दुसऱ्याच ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर विराट कोहलीच्या रुपात पहिला धक्का बसला. त्यानंतर पुढल्याच ओव्हरला रोहित शर्मा संघाची धावसंख्या 19 वर असताना तंबूत परतला. ऋषभ पंत आणि अक्सर पटेलने 39 धावांची पार्टनरशीप केली. मात्र पटेलही संघाची धावसंख्या 58 वर असताना बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला सूर्यकुमार यादवही फारकाळ मैदानावर टीकला नाही. 12 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर संघाची धावसंख्या 89 वर असताना चौथी विकेट सूर्यकुमार यादवच्या रुपाता पडली. त्यानंतर स्कोअरबोर्ड 95 वर असताना शिवम दुबे तंबूत परतला. संघाची धावसंख्या 96 वर असतानाच पंत तंबूत परतला. पहिल्याच बॉलवर भोपळाही न फोडता रविंद्र जडेजा झेलबाद झाला. 7 धावांची भर घालून हार्दिक पंड्या 112 वर स्कोअरबोर्ड असताना तंबूत परतला. धावसंख्येत एकाही रनची भर न घालता बुमरहालाही आला तसाच परतला. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर अर्शदीप आणि मोहम्मद सिराजने केलेल्या 7 धावांची पार्टरनशीप केली.

तळाच्या फलंदाजांची कामगिरी

अर्शदीप आणि सिराजने दोन ओव्हर खेळू काढल्या. यामध्ये दोघांनी एकूण सात धावांची भर टाकली. 112 वर असताना भारताची नववी विकेट गेली. मात्र तळाच्या या दोन फलंदाजांनी आपल्यापरीने फटकेबाजीचा प्रयत्न केला. अर्शदीपने 13 बॉलमध्ये एका चौकाराच्या मदतीने 9 धावा केल्या. तर सिराजने 100 च्या स्ट्राइकरेटने बॉल इतके रन करत 7 धावांची भर घातली. चोरटी धाव घेण्याच्या नादात अर्शदीपला 19 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर बाबर आझमने रनआऊट केलं. 

नक्की वाचा >> T20 World Cup Ind vs Pak: 'गर्विष्ठ आणि बेजबाबदारपणे..', गावसकर टीम इंडियावर संतापले

याच धावा ठरल्या निर्णयाक

अर्शदीप आणि सिराजने या सात धावा नसत्या केल्या तर भारताचा डाव 112 धावांवरच आटोपला असता. आता सामन्याचा संपूर्ण निकाल पाहिल्यास पाकिस्तानच्या संघाने 113 धावांपर्यंत मजल मारली. म्हणजेच भारताचे तळाचे दोन फलंदाज एकही धाव न करता बाद झाले असते तर भारताने सामना 3 विकेट्सने गमावला असता.

पाकिस्तान जिंकला असं वाटत असतानाच...

20 ओव्हरमध्ये प्रत्येक चेंडूमागे एक धाव इतक्या माफक अशा 120 धावांचं आव्हान पाकिस्तान सहज गाठेल असं वाटतं होतं. धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघ हा सामना जिंकणार असं चित्र दिसत होतं. अगदी 48 बॉलमध्ये 48 धावा हव्या असताना पाकिस्तानच्या हाती 8 विकेट्स होत्या. मात्र भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांनी दमदार पुनरागमन करत पाकिस्तानी संघाची दाणादाण उडवली. या दोघांनी केलेल्या अचूक माऱ्यासमोर पाकिस्तानी संघ खेळपट्टीवर टीकलाच नाही.

नक्की वाचा >> T20 World Cup: 'मी बुमराहबद्दल फारसं...', पाकिस्तानला हरवल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माचं सूचक विधान

बुमराहने 14 धावा देत 3 तर हार्दिकने 24 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. भारताप्रमाणे पाकिस्तानचाही डाव गडगडला आणि त्यांना 20 षटकांमध्ये 113 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताने हा सामना 6 विकेट्सने जिंकला.