राकेश झुनझूनवालांचा आवडता शेअर पुन्हा दमदार पैसा खेचण्याच्या तयारीत; तुम्ही गुंतवणूक केली का?

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझूनवाला यांच्या पोर्टफोलिओकडे छोट्या मोठ्या गुंतवणूकदारांचे लक्ष असते. 

Updated: Nov 16, 2021, 01:53 PM IST
राकेश झुनझूनवालांचा आवडता शेअर पुन्हा दमदार पैसा खेचण्याच्या तयारीत; तुम्ही गुंतवणूक केली का? title=

मुंबई : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझूनवाला यांच्या पोर्टफोलिओकडे छोट्या मोठ्या गुंतवणूकदारांचे लक्ष असते. ज्या शेअरचे फंडामेंटल मजबूत आहेत. अशा स्टॉकवर गुंतवणूकीचा सल्लाही एकस्पर्ट्सकडून दिला जातो. झुनझूनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील असाच एक स्टॉक म्हणजे Va Tech Wabag ltd होय. 

Va Tech Wabag ltd ही एक वॉटर ट्रिटमेंट कंपनी आहे. ज्याचे सप्टेंबर तिमाहीमध्ये दमदार निकाल आले आहे. कंपनीचा वार्षिक नफा 86 टक्क्यांनी वाढला आहे. निकालांनंतर नोमुरा ब्रोकरेज हाऊसने शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. सध्याच्या लेव्हलवरून गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 65 टक्क्यांचा रिटर्न मिळू शकतो. कंपनीची ऑर्डरबुक मजबूत आहे. 

65 टक्क्यांपर्यंत रिटर्न अपेक्षित

ब्रोकरेज हाऊस नोमुराने Va Tech Wabag ltd शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसने या शेअरसाठी 581 रुपयांचे लक्ष दिले आहे. सध्या हा शेअर 353 रुपयांवर ट्रेड करीत आहे.  या लेव्हलवरून गुंतवणूक केल्यास तसेच लक्ष पूर्ण झाल्यास 65 टक्क्यांचा रिटर्न मिळू शकतो. 

कंपनीकडे ऑर्डरबुक चांगली आहे. वॉटर ट्रिटमेंटच्या मोठ्या योजनांचे काम कंपनीकडे आहे. याचा कंपनीला फायदा होईल. तसेच ईएसजी रिलेटेड वॉटर कॅपिटल एक्सपेंडिचरपासून कंपनीला दीर्घ अवधीसाठी फायदा होऊ शकतो. 

1 वर्षात 88 टक्क्यांपर्यंत रिटर्न

Va Tech Wabag ltd च्या शेअरने मागील वर्षभरात 88 टक्क्यांनी रिटर्न दिला आहे. या दरम्यान शेअरचा भाव 188 टक्क्यांनी वाढून 365 रुपये झाला आहे.