मुंबई : दीव केंद्रशासित प्रदेशाच्या नागोवा समुद्रकिनाऱ्यावर रविवारी पॅराशूटची दोरी तुटल्याने एक शिक्षिका आणि तिचा नवरा समुद्रात पडले. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समुद्रापासून अनेक फुट उंचीवर हे दोघं पॅरासेलिंगचा आनंद घेत होते. अनेक फूट उंचीवरून दिव समुद्राचा आनंद घेत असताना अचानक एक अघटीत घडलं.
काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. नक्की या जोडप्याच पुढे काय झालं? हे सगळ्यांनाच जाणून घ्यायच आहे. तर पुढे असं झालं की, या जोडप्याने त्यांचे लाइफ जॅकेट घातले होते आणि लोकप्रिय बीचवर तैनात असलेल्या जीवरक्षकांनी त्यांची सुटका केली.
Husband and wife fell in sea after rope of parachute broke while doing Parasailing in Diu, both are safe.#Parasailing #diu #Gujarat #sport #Accident pic.twitter.com/Xf4vtZHKMk
— My Vadodara (@MyVadodara) November 14, 2021
देवभूमी द्वारका येथील भानवड तालुक्यातील सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षिका सरला काथड (३१) आणि त्यांचे पती अजित काथड (३०) गुजरातच्या उना किनाऱ्यावर समुद्रकिनारी पॅरासेलिंग करण्यासाठी गेले होते. रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ते हवेत गेल्यानंतर सुमारे एक मिनिटानंतर, त्यांच्या पॅराशूटची दोरी त्या पॉवरबोटला बांधली जी तिला ओढत होती ती तुटली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अजितचा मोठा भाऊ राकेश त्या पॉवरबोटीवर बसले होते. व्हिडीओत तो घाबरून ओरडतानाही ऐकू येतो, कारण बोट चालकांनी त्याला सांगितले की, “काहीही होणार नाही. त्यांना तुम्ही घाबरू नका.” पॅराशूट किनार्यापासून सुमारे 100 मीटर अंतरावर उतरले आणि पॅरासेलिंग सेवा चालविणारी खाजगी कंपनी पाम्स ऍडव्हेंचर अँड मोटरस्पोर्ट्स (PAM) च्या जीवरक्षकांनी या जोडप्याला वाचवले.
आम्ही जास्तीत जास्त उंची गाठल्यावर दोरी तुटल्यानंतर, पॅराशूट एका मार्गावरून दुसरीकडे हलू लागला कारण आम्हाला ते कसे नियंत्रित करावे हे माहित नव्हते. काही सेकंदांनंतर आम्ही समुद्रात डुंबलो. आमच्या लाइफ जॅकेटमुळे आम्ही तरंगत राहिलो, तेव्हा माझी पत्नी धक्कादायक अवस्थेत होती आणि काही मिनिटे बोलू शकली नाही.
आमचा पॅराशूट ज्या पॉवरबोटवर बांधला होता त्या पॉवरबोटला आम्ही मदतीची विनंती केली. पण त्यांनी आम्हाला सांगितले की जीवरक्षक आम्हाला वाचवतील. सुमारे पाच मिनिटांनंतर, जीवरक्षक दुसर्या पॉवरबोटीवर आले आणि त्यांनी आमची सुटका केली.