Rakesh Jhunjhunwala यांच्या जिद्दीला सलाम! पायावर उभं राहता येत नसतानाही केला डान्स;Video

आजारपणातही दिसला उत्साह, फॅमिली पार्टीत डान्स करून कुटुंबियांच मनोरंजन,पाहा Video   

Updated: Aug 14, 2022, 03:13 PM IST
Rakesh Jhunjhunwala यांच्या जिद्दीला सलाम! पायावर उभं राहता येत नसतानाही केला डान्स;Video  title=

मुंबई : भारतीय शेअर बाजाराचे बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे आज वयाच्या 62 व्या वर्षी दीर्घ आजारपणाने निधन झालं. त्यांच्या मागे पत्नी आणि तीन मुले आहेत. दरम्यान झुनझुनवाला यांच्या निधनानंतर त्यांना आता विविध क्षेत्रातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्यात आता राकेश झुनझुनवाला यांच्या यशासोबतच त्यांच्या जिंदादिलीची मिसाल देण्यात येत आहे. या  संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.  

राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करून करोडोंचा पोर्टफोलिओ बनवला होता. तसेच त्यांच्याकडे शेअर बाजारातील यशाचे उदाहरण म्हणून पाहिले जात होते. राकेश झुनझुनवाला हे जिद्दीचेही मिसाल आहे. त्यांची ही जिद्द एका व्हिडिओत दिसून येते.

व्हिडिओत काय?
राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते डान्स करताना दिसत आहे. राकेश झुनझुनवालाच्या या जुन्या व्हिडिओमध्ये तो आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत एका कार्यक्रमात असून 'कजरारे-कजरारे' गाण्यावर नाचताना दिसले आहेत. आजारपणही राकेश झुनझुनवाला यांचा सेलिब्रेशन पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काचं बसला. आजारपणात ही त्यांची जगण्याची जिद्द व उत्साह अनेकांना प्रेरणा देणारा आहे. 

दरम्यान राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचा हा व्हिडिओ आता पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.