राज्यसभा निवडणूक : भाजपचा चकवा, अखेरच्या क्षणी हंसराज अहिर यांचे नाव

माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांचे नाव राज्यसभेसाठी पुढे येत आहे. 

Updated: Mar 12, 2020, 12:05 PM IST
राज्यसभा निवडणूक : भाजपचा चकवा, अखेरच्या क्षणी हंसराज अहिर यांचे नाव title=

नवी दिल्ली : राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये चांगलीच चुरस सुरू आहे. परंतु आता अचानकपणे माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांचे नाव पुढे येत आहे. विद्यमान खासदार संजय काकडे आणि अमर साबळे यांचे नाव मागे पडले आहे. तर शाम जाजू आणि विजया रहाटकर यांच्याऐवजी हंसराज अहिर यांना भाजप नेत्यांनी पसंती दिल्याची सूत्रांची माहिती आहे. 

अखेरच्या क्षणी हंसराज अहिर यांचे नाव राज्यसभेसाठी पुढे आल्याने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव मागे पडले आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेही नाव पुढे येत होते. दरम्यान, पुण्यातील संजय काकडे यांच्यासह अमर साबळे, शाम जाजू, विजया रहाटकर यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. आता ही नाव मागे पडली आहे.

विधानसभेतल्या सध्याच्या संख्याबळानुसार राज्यसभेवर ७ पैकी महाविकासआघाडीचे ४ तर भाजपचे ३ उमेदवार निवडून जाऊ शकतात. या ७ पेक्षा एखाद्या उमेदवाराने अर्ज भरला तर मात्र राज्यसभेसाठी निवडणूक होऊ शकते. जर सातच अर्ज दाखल झाले, तर मात्र राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होईल.

दरम्यान, भाजपने  याआधी साताऱ्याचे नेते उदयनराजे भोसले आणि मंत्री रामदास आठवले यांची नावे निश्चित केली आहे. तिसरे नाव कोणाचे असेल याची चर्चा होती. अखेरच्या क्षणी हंसराज अहिर यांचे नाव पुढे पडल्याने भाजपमधील नाराजीमध्ये अधिक भर पडण्याची शक्यता आहे.

0