चेन्नई : सुपरस्टार रजनीकांत यांनी वर्षाच्या शेवटच्या दिवशी मोठा निर्णय घेतला. राजकारणात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी आज जाहीर केले. माझ राजकारणात येणं निश्चित आहे. 'मी राजकारणात येत आहे. आज ही सर्वात मोठी गरज बनली आहे.'
तामिळनाडूमधील लोकशाही सध्या संकटात आहे. इतर राज्ये आपल्या राज्याची खिल्ली उडवत आहेत. मी जर हा निर्णय घेतला नसता तर मला नक्कीच अपराध्यासारखे वाटले असते. म्हणूनच मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतलाय.
रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशानंतर तामिळनाडूतील वातावरण चांगलोच तापले आहे. दरम्यान भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामींनी रजनीकांत यांची खिल्ली उडविली आहे.
Let him announce political party name and candidates and then I will expose him: Subramanian Swamy,BJP on #Rajinikanth pic.twitter.com/7rgIFvj1Ky
— ANI (@ANI) December 31, 2017
रजनीकांत अशिक्षित आहेत. मीडियाच लक्ष खेचून घेण्यासाठीच ते अस करतायत अशा शब्दात अशा शब्दात सुब्रह्मण्यम यांनी खिल्ली उडविली आहे.
तामिळनाडूचे लोक समजदार आहेत ते योग्य निर्णय घेतील असेही ते म्हणाले. कोणते डॉक्यूमेंट नाही, कोणती योजना नाही तरी रजनीकांत यांनी राजकारणात येण्याची घोषणा केलीए, असा टोलाही त्यांनी रजनीकांत यांना लगावला.
राज्यात मूलभूत बदलांची गरज आहे. लोकशाहीच्या नावावर हे राजकारणी आपल्याला लुबाडत आहेत. मुळापासून बदल व्हायला हवा.
In next assembly elections I will form a party and will contest all constituencies in Tamil Nadu : #Rajinikanth pic.twitter.com/86ElT08qU3
— ANI (@ANI) December 31, 2017
सत्य, कार्य आणि विकास हे माझ्या पक्षाचे तीन मंत्र आहेत, असे रजनीकांत यांनी यावेळी सांगितले.