या ३ मंत्रांसोबत रजनीकांत यांचा राजकारणात प्रवेश

तमिळनाडूमधील सुपरस्टार रजनीकांत बऱ्याच काळापासून राजकारणात येणार अशी चर्चा होती. अखेर रजनीकांत यांनी राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. चेन्नईच्या राघवेंद्र कल्याण मंडपममधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 31, 2017, 10:39 AM IST
या ३ मंत्रांसोबत रजनीकांत यांचा राजकारणात प्रवेश title=

चेन्नई : तमिळनाडूमधील सुपरस्टार रजनीकांत बऱ्याच काळापासून राजकारणात येणार अशी चर्चा होती. अखेर रजनीकांत यांनी राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. चेन्नईच्या राघवेंद्र कल्याण मंडपममधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.

विधानसभा निवडणूक लढवणार

सुपरस्टार रजनीकांत राजकारणात येण्याच्या चर्चा आता संपल्या आहेत. त्यांनी म्हटले की, ते एक नवीन पक्ष तयार करणार आहेत. पुढील विधानसभेमध्ये ते मैदानात उतरणार आहेत. चेन्नईत आपल्या भाषणादरम्यान, रजनीकांत यांनी सांगितले की, ते पुढील विधानसभा निवडणूक लढवत आहेत. चेन्नईतील सर्व जागांवर ते आपले उमेदवार उभे करतील. या घोषणेनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये जबरदस्त उत्साह निर्माण झाला आहे.

पक्षाचे ३ मंत्र

रजनीकांत यावेळी म्हणाले की, यावेळी लोकशाहीची धोक्यात आहे आणि सगळेच लोकं तामिळनाडूची खिल्ली उडवत आहे. जर मी यावर काही निर्णय नसता घेतला तर मी दोषी ठरलो असतो. त्यांनी असेही म्हटले आहे की, लोकशाहीच्या नावावर नेते आपल्या स्वतःच्या जमिनीवर आपले पैसे लुटत आहेत. आपल्याला हे मुळापासून बदलण्याची गरज आहे. सत्य, कार्य आणि विकास हे त्यांच्या पक्षाचे तीन मंत्र असतील.