राजस्थान : मंत्री, आमदार-खासदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात कामावरुन किंवा अन्य कारणांवरुन अनेकवेळा खटके उडल्याचे पाहायला मिळतात. अनेकदा सोशल मीडियावर यावरुन मंत्र्यांवर टीका केली जाते. असाच काहीसा प्रकार राजस्थानात (rajasthan) पाहायला मिळाला. बिकानेरमध्ये (bikaner) एका कार्यक्रमादरम्यान राजस्थान सरकारमधील मंत्री रमेश मीणा (ramesh chand meena) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फटकारले आणि त्यांना स्टेजवरुन उठून जाण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जिल्हाधिकारी भगतवी प्रसाद (bhagwati prasad) यांना फोनवर बोलताना मंत्री रमेश मीना यांना राग अनावर झाला.
रमेश मीणा हे अशोक गेहलोत सरकारमध्ये पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्री आहेत. सोमवारी बिकानेरमध्ये ते राजस्थान ग्रामीण उपजीविका विकास परिषदेशी संबंधित बचत गटांच्या महिलांशी संवाद साधत होते. या कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर जिल्हाधिकारी भगवती प्रसाद हेही उपस्थित होते. पण मीणा यांचे भाषण सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांचा फोन वाजला. भगवती प्रसाद यांनी फोन उचलला बोलल्यास सुरुवात केली. यावर रमेश मीणा भगवती प्रसाद यांच्यावर भडकले.
"ही काय पद्धत आहे? तुम्ही आमचे का ऐकत नाहीत? या राज्यात नोकरशहा इतके वर्चस्व गाजवत आहेत की ते मंत्र्याचे ऐकत नाहीत? तुम्ही जा इथून. ही काय पद्धतआहे? जो अधिकारी काम करणार नाही आणि आमच्या सरकारी योजना ऐकणार नाहीत ते या सरकारला अडचणीत आणतील. तुम्हाला कितीही कॉल आलेत तरी यापेक्षा महत्त्वाचे आहे का? गरिबांसाठी सरकारच्या योजना आहेत. अधिकाधिक महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. त्यांना पुढे कसे जायचे. त्यांना कर्ज मिळत आहे की नाही. त्यांना त्यांच्या व्यवसायात नफा मिळतोय की नाही हे सगळं पाहण्यासाठी आम्हाला पाठवले आहे," अशा शब्दात मीणा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना खडसावले.
कांग्रेस सरकार में मंत्री रमेश चंद मीना द्वारा बीकानेर जिला कलेक्टर के साथ किया गया अभद्र व्यवहार अत्यंत निंदनीय है।
गहलोत सरकार के मंत्रियों ने जनता के हितों और भावनाओं का तो मजाक बना ही रखा है लेकिन अब उनसे आधिकारी भी परेशान होने लगे है। pic.twitter.com/YqGaxB0RMW
— Bhupendra Saini (@bjpbhupendraRYB) November 21, 2022
यानंतर, भगवती प्रसाद काही वेळाने पुन्हा स्टेजवर परतले. मात्र आता रमेश मीणा यांच्याविरोधात निषेध नोंदवला जात आहे. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांकडून टाळ्या मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या मंत्र्याने अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचे लोक सोशल मीडियावर म्हणत आहेत. राजस्थानच्या आयएएस असोसिएशनने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहून आपल्या मंत्र्याबाबत तक्रार केल्याचीही चर्चा आहे.