भाजप मंत्र्याने उघड्यावर केली लघुशंका, फोटो झाला व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना स्वच्छ भारत मोहिमेत सहभागी होण्यास सांगत आहेत. मात्र, त्यांच्याच पक्षाचे नेते या मोहिमेला हरताळ फासत असल्याचं पहायला मिळत आहे

Sunil Desale Sunil Desale | Updated: Feb 15, 2018, 09:06 AM IST
भाजप मंत्र्याने उघड्यावर केली लघुशंका, फोटो झाला व्हायरल title=
Viral Photo

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना स्वच्छ भारत मोहिमेत सहभागी होण्यास सांगत आहेत. मात्र, त्यांच्याच पक्षाचे नेते या मोहिमेला हरताळ फासत असल्याचं पहायला मिळत आहे

फोटो झाला व्हायरल

राजस्थानचे आरोग्यमंत्री कालिचरण सराफ यांचा एक फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत कालिचरण सराफ हे रस्त्याच्या कडेला उभे राहून लघुशंका करताना दिसत आहेत.

विरोधी पक्षाने केली कारवाईची मागणी

कालिचरण सराफ यांचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षातील काँग्रेस पक्षाने कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेसंदर्भात अद्याप कालिचरण सराफ यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हायरल होत असलेला हा फोटो राजस्थानमधील जवाहर नगर येथील झालना बायपासवर काढण्यात आला आहे.

आरोग्यमंत्री कालिचरण सराफ ज्या ठिकाणी लघुशंका करत आहेत त्याच ठिकाणी त्यांची सरकारी गाडी आणि त्यांचा सुरक्षारक्षकही उभा असल्याचं दिसत आहे.

फोटो व्हायरल झाल्याने खळबळ

स्वत: आरोग्यमंत्रीच अशा प्रकारे उघड्यावर लघुशंका करत असल्याचा फोटो व्हायल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विरोधी पक्षाने कारवाईची मागणी केली आहे.